पाडगावकर/दाते/देव या त्रयीने एकेकाळी संधीकाळातील सुरावट रचली- त्या दूरच्या दिव्यांनाही स्वतःची कहाणी सांगण्यावर बंदी घातली.
आता बोलायचे कोणाशी?
मातीलाही सवय नाही “इथे फुलांची निशाणी ठेवण्याची ! “
मग खुणेच्या वाटेवर फुलांचाही शोध का घ्यावा ?
बाह्य लढती दिसतात, शब्दांकित करता येतात , बरेचदा समजतातही ! “आतल्या ” लढतींचे काय करायचे? मुद्दाम आज #अरुणशेवतेंचा दिवाळी अंक (#ऋतुरंग ) आणला. त्यांतही लढतींचे पाच सर्ग (एपिसोड्स ) आहेत पण एकही “आतला ” लढा नाही.
आणि त्यानंतर कवी अनिल आठवले – ” किती दूरची लागे झळ आंतल्या जीवा, गाभ्यातील जीवनरस सुकत ओलावा ! “
२००६ च्या डिसेंबरात तीन दिवस सूर्यप्रकाशी बाबा आमटेंच्या “आनंदवनात ” सहकुटुंब घालविले आणि आख्ख्या आमटे परिवाराचे (डॉ प्रकाश आमटे फक्त तेथे नव्हते) आम्ही फॅन झालो. बाबांचा वाढदिवस त्यांच्या उपस्थितीत साजरा केला, आणि ते दिवस आजतागायत हाताला चिकटून आहेत.
आजचे त्या घराण्याचे वृत्त wrong doing आणि right doing च्या कल्पनांच्या पलीकडचे आहे. मात्र ” युद्धानंतर तह करायचे असतात ते शांतीसाठी, चिरशांतीसाठी खचितच नव्हें !”
आपण आणू या ” डोळ्यांत सांजवेळी पाणी !! “#SheetalAmte
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply