स्थिर आहे जग म्हणूनी, अस्थिर आम्ही जगू शकतो
अस्थिर आहे जग म्हणून, स्थिर आम्ही जगू शकतो….१,
पोटासाठी वणवण फिरे, शोधीत कण कण अन्नाचे
थकला देह विसावा घेई, कुशीत राहूनी धरणीचे….२,
धरणी फिरते रवि भोवतीं, ऋतूचक्र हे बदलीत जाते
जगण्यामधला प्राण बनूनी, चैतन्य सारे फुलवून आणते….३,
पूरक बनती गुणधर्म परि, स्थिर असतो वा अस्थिर ते
विश्वचक्र फिरवित राहणे, निसर्गाचे तत्वची असते……४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply