आम्रवनांतील शोभा बघत, भटकत होतो नदी किनारी
मैनेची ती ओरड ऐकूनी, नजर लागली फांदीवरती…१
एक धामण हलके हलके , घरट्याच्या त्या नजीक गेली
पिल्लावरती नजर तिची, जीभल्या चाटीत सरसावली…२,
मैनेच्या त्या मातृहृदयाला, पर्वा नव्हती स्वदेहाची
जगावयाचे जर पिल्लासाठी, भीती न उरी ती मृत्यूची…३
युक्त्या आणि चपळाईने, तुटून पडली त्या मृत्यूवरी
रक्त बंबाळ ते केले शरीर, चोंच मारीत धामणीवरी….४
अखेर धामण वृक्ष सोडते, जखमी होवूनी शरिराने
पिल्लामध्ये बसूनी मैना, शांत करिते हृदय स्पंदने
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply