जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर
काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची
हळुवार शब्दांनी फुलवतो मने
विकासाच्या फुलांना गंध देतो
त्याला आयुधं लागत नाही –
वन्ही पेटवायला !
तो अनादी आहे- अनंत आहे
त्याच्यावाचून जग शक्य नाही
तो कधी सांदीपनी होतो ,
कधी चाणक्य
तर कधी अब्दुल कलाम
आई तर तो कायम असतोच
पण वडिलपणही अबोलपणे निभावतो
” त्यांच्या” यशाने तो प्रफुल्लित होतो
पण अपयशाने खचून जात नाही
त्याच्या कार्याला निराशा, औदासिन्य
इत्यादींची परवानगी नसते.
“त्यांच्या ” मधून तो स्वतःसारखे
काहीजण तयार करतो –
परंपरेचा प्रवाह सुरु ठेवण्यासाठी
त्याला सेवानिवृत्ती नसते
आणि वेळ काळाचे बंधनही
पद -प्रतिष्ठा, नावलौकिक , पारितोषिके
त्याच्या लेखी नगण्य
त्याची झाडे बहरत असतात डौलाने
पिढ्यान पिढ्या
एवढी नोंद त्याला पुरते
जगातल्या प्रत्येकाला
त्याची गरज असते.
तो ” विशेष नाम ” नसतो,
नसतो एखादा व्यवसाय
तो काळावर नाममुद्रा रेखाटून
चिरंजीव होतो पाना पानांवर
तो असतो – शिक्षक
” गुरु ” पदाचे
समाजातील दृश्य रूप !!
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply