नवीन लेखन...

संकटकाळात नेतृत्वाची कसोटी !

पेचप्रसंगांवर मात करायची असेल तर नेतृत्व तितकेच खंबीर आणि प्रभावी असावे लागते. समस्याचे निराकरण करण्यासाठी नवे मार्ग शोधावे लागतात. यासाठी नेमका कळीचा मुद्दा काय आहे, त्याला आपला प्रतिसाद कसा असावा , संकटापासून मुक्ती आणि मिळालेला शहाणपणाचा ऐवज (जो भावी काळात उपयुक्त ठरू शकतो.) हे टप्पे पार करावे लागतात. आसपास गोंधळाची परिस्थिती असल्याने अग्रक्रम ठरवून, त्या दिशेकडे निर्देश करणारे नेतृत्व अशावेळी आवश्यक असते. सहकाऱ्यांचे अवधान जबाबदाऱ्यांकडे केंद्रित करण्यासाठी, निर्णयांचा आढावा घेण्यासाठी संवादी नेतृत्व हवे असते. मगच मनातील गोंधळावर आणि अनिश्चिततेवर मात करता येते.

कोरोना विषाणूचे संकट आपल्याला घेरत असताना नेतृत्वाला मानवता आणि आस्था या दोन गुणविशेषांची जास्त गरज आहे. मानवता म्हणजे इतरांच्या गरजांबाबत जागरूकता आणि संवेदना !

संकटकाळाचे गांभीर्य दोन गोष्टींनी अधोरेखित होत असते – माहितीचा अंदाधुंद मारा आणि शीघ्र कृतीचे बंधन ! इथे वेळेचे दडपण अंगावर येते. आणीबाणीच्या काळात कोणीही एकेकटे काम करणे अभिप्रेत नसते. आपलं सह-अस्तित्व तितकंच परस्परावलंबी असल्याने सगळ्यांना सहमतीने ,सामंजस्याने वागावे लागते. एकाचा निर्णय इतरांवर साधक -बाधक परिणाम करू शकतो.

संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य  होईल. कृतीसाठी सामुहिक  स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो.

कृतीसाठी सामुहिक  स्वर-

करोना विषाणूच्या प्रभावाखालील या कालखंडात ” मी कसे वागतो याचा तुमच्यावर प्रत्यक्ष परिणाम होणार आहे आणि तुमच्या वागण्याचा माझ्यावर ” अशी परिस्थिती उदभवली आहे. याचाच अर्थ माझ्यावर फक्त माझ्याच आरोग्याची जबाबदारी नसून इतरांच्याही आरोग्याची आहे.

स्वतःच्या आवडी नुसार आणि कौशल्या नुसार एक व्यावसायिक म्हणून मी केलेली प्रत्येक कृती  या आपत्तीला मिळणारा प्रतिसाद यशस्वी करतो की नाही हे बघणे नेतृत्वाचे कर्तव्य आहे. प्रत्येकजण आपापला खारीचा वाटा नक्कीच उचलून हा लढा जिंकण्यास हातभार लावू शकतो. आसपास बघितले तर प्रत्येकजण या लढ्यास कसं तोंड देतोय आणि या जीवघेण्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी कसा धडपडतोय हे सहज दिसेल. तुमचे कुटुंबीय ,मित्र,कार्यालयीन सहकारी त्यांना जे शक्य होईल ते करताहेत. समाजात या घडीला सर्वजण एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे येताहेत. संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मदतकार्याची माध्यमांवर जाहीर प्रसिद्धी करीत आहे आणि त्यांना पाठबळ देत आहेत. व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर कार्य करणाऱ्यांना गौरवित आहे. त्याचप्रमाणे नैराश्य ,भिती, चिंता इ.  भेडसावणाऱ्यांना समुपदेशन करणे, मानसिक आधार देणे हेही नेतृत्वाचे काम आहे. यासाठी नवीन शब्द तयार करण्यात आला आहे – कोरोनंगझायटी ! सतत आजारी पडू ,करोना मुळे मृत्युमुखी पडू, संसर्गाची भिती वाटणे, उपजीविकेचे साधन (नोकरी /व्यवसाय) गमावणे, एकट्याने काम करण्याचे भय वाटणे आणि करोनाचा प्रादुर्भाव झालाच तर नोकरीवरून काढून टाकण्याची भिती या साऱ्या भावना यांत समाविष्ट आहेत. अशा भावनांनी ग्रस्त असलेल्यांसाठी तात्काळ मनोविकास तज्ज्ञांकडून उपचार उपलब्ध करून देणे नेतृत्वाचे काम आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक ,मानसिक ,भावनिक ,आर्थिक ,कौटुंबिक आरोग्याची काळजी नेतृत्वाने अशा अवघड आणि जीवघेण्या प्रसंगी घेणे अभिप्रेत आहे. एका व्यक्तीने त्याचा अनुभव समाज माध्यमांवर लिहिला आहे-

” माझ्या घरी एका नातेवाईकाचे दुःखद निधन झाले. मला वाटले कंपनीकडून नेहेमीप्रमाणे सांत्वनाचे छापील पत्र येईल. पण सलग दोन दिवस सकाळ -संध्याकाळ कंपनीतून माझ्या घरच्यांसाठी जेवणाचे डबे आले आणि माझा ऊर भरून आला.” किती बोलके उदाहरण आहे हे !

छोट्या बाळाची जबाबदारी आहे म्हणून एखादा सहकारी तुम्हाला मिटिंगची वेळ बदलण्याची विनंती करेल. त्याचवेळी कुटुंबातील एखाद्या सदस्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभागी व्हायचे असेल. शेजारचे विनंती करतील – ” जरा ही औषधे आणून द्याल कां, कोठेच मिळत नाहीत.” असे एक ना दोन प्रसंग पदोपदी भेटतील आणि आपली परीक्षा पाहतील.

तुमची संस्था कोरोना वर लस तयार करण्यासाठी रात्रंदिवस झटत असेल आणि त्यांत तुमचा वाटा सिंहाचा असू शकेल. किती आणि कशी व्यक्तिगत आणि सामुहिक वर्तुळे एकमेकांत गुंतलेली असतात.

आपापल्या नैपुण्यासह सरकारी ,संस्थात्मक आणि व्यक्तिगत पातळ्यांवर असे आपण कृतीवर होऊ शकतो. कोरोनाने उभ्या केलेल्या जगड्व्याळ समस्येला अशा सामुहिक प्रयत्नांनी आपण सामोरे जाणे आता संयुक्तिक ठरेल.

आपली निजखूण –

सध्याचा या “न भूतो न भविष्यती ” परिस्थितीचा प्रत्येकालाच वेगवेगळ्या पातळ्यांवर सामना करावा लागतोय आणि तोही बहुतांशी पूर्वतयारीविना ! साधारण दोन महिन्यांपूर्वी कोणाला असे स्वप्नही पडले नसेल. सर्वच आघाड्यांवर गोंधळाची परिस्थिती आहे , शस्त्रसज्जता नाही आणि समोरच्या शत्रूचा अदमासही लागत नाही. रात्रंदिवस अंगावर येणारी आकडेवारी भयावह आहे आणि औषधाची लसही नाही. या गोंधळात आपण स्वतःला विसरतो आहोत ही फार मोठी चूक नाही कां ? स्वतःच्या सुप्तगुणांचा आणि क्षमतांचा विसर पडून कसे चालेल ? आपली निजखूण ओळखायला नको कां ? जगातील सर्वात मोठे संसाधन आपण स्वतः असतो.

उदाहरणार्थ आता तुम्हांला “घरातून काम ” ही सोय उपलब्ध आहे कारण घरात  कॉम्पुटर , इंटरनेट, वाय -फाय असे तंत्रज्ञान आहे. ज्यांना रोज प्रत्यक्ष कामावर जावेच लागते (अशा परिस्थितीतही) त्यांच्या पेक्षा आपण सुदैवी नाही कां ? या दोन गटांच्या मानसिकता समजून घेण्याची ही उत्तम संधी आहे. यानिमित्ताने कार्यस्थळावरील कमतरतांबाबत आपण सदैव कशा तक्रारी करीत असतो हे आठवून बघावे. घरी काम करताना मात्र आपण सगळ्या गैरसोयी नजरेआड करीत असतो.

दुसरे उदाहरण बघू या -सध्या शाळा बंद आहेत. मात्र तुमच्या घरी कॉम्पुटर ,इंटरनेट अशा सोयी आहेत, ऑन -लाईन शिकवायला शाळेतील शिक्षक तयार आहेत, पाठ्य पुस्तके सहजी डाउनलोड करता येत आहेत. मग सरकारी शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांपेक्षा तुमची मुले अधिक सुदैवी नाहीत का? त्यांचे (इतर मुलांच्या मानाने ) नुकसान किमान होत आहे.

मात्र हे दीर्घ कालावधीपर्यंत सुरु राहिलं तर कदाचित अशा मुलांचे एक मौल्यवान वर्ष (त्यांचा काहीही दोष नसताना ) वाया जाऊ शकते.

तुमच्या जबाबदाऱ्या इतरांवर सोपवा –

स्वतःच्या पूर्ण क्षमतांनिशी जेव्हा आपण या लढ्यात उतरू त्यावेळी तुमच्या काही जबाबदाऱ्या इतरांवर सोपवा

— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..