माझे शिक्षण संपले . वडिलोपार्जित रूलिंग ,बाइंडिंग , प्रिंटिंग ,पब्लिशिंग या व्यवसायात आलो ..हळू हळू लिहित राहिलो . छोटी तीन पुस्तिका लिहिल्या देखील . प्रकाशन व्यवसायामुळे मात्र अनेक कवी , साहित्यिक व्यक्तींशी परिचय झाला. प्रूफ रिडींग मुळे वाचनाचा छंद लागला..
लेखन किंवा काव्य प्रकाराकडे वळलो नव्हतो. पण योगायोगाने व्यवसायाची व्याप्ती वाढली होती . पण माझ्या अहंपणामुळे / गर्विष्ठपणामुळे / आडमुठेपणामुळे मला व्यवसायात एक मोठ्ठा फटका बसला ..रत्नागिरी जिल्ह्याचे माझे एक मोठ्ठे कामाचे टेंडर नामंजूर झाले होते तो माझा मूर्खपणा होता.
खुपच विमनस्क झालो होतो. चिंताग्रस्त झालो. पश्चाताप झाला . मग रत्नागिरीतून सरळ पावसला गेलो ..! तिथे राहिलो. त्या अत्यन्त विदारक मानसिक उद्विग्न अवस्थेत मला पहिली रचना पावसच्या स्वामी स्वरूपानंद मन्दिरातील खालील चिदंबर गुहेत सूचली. हाच टर्निंग पॉईंट ऑफ लाईफ ठरला.
हा सारा वृत्तांत मी लिहिलेल्या ” *आत्मरंग* या पहिल्या काव्यसंग्रहात लिहिलेल्या मनोगतात लिहिला आहे..मी काव्या कड़े वळलो . कळत नकळत ११६ रचना कधी झाल्या कळलेही नाही . ती केवळ स्वामी स्वरूपानंदांचीच कृपा होती हेच निर्विवाद .!
बालपणी मी माझा शेजारी हरहुन्नरी ( मित्र) कै. अशोक ( बाळ ) देसाई मुळे मेळ्यात देखील काम केले होते म्हणुन थोड़ी गेयता , सुर ताल गाणे यांची जाणीव होती. आज बाळ देसाई नाही याची प्रचंड खंत आहे. त्यामुळे मी सर्वच रचना गेयतेत , ठेक्यात लिहिल्या स्वतः गुणगुणल्या देखील .
माझ्या काव्य वाचनाचे खाजगी स्वरुपात बरेच कार्यक्रम झाले .एकदा तर मित्रासोबत सलग १० तास कार्यक्रम झाला . मलाही आश्चर्य वाटले . पुढे मीच माझे एफएम रेडिओवर स्पिकरवर माझे रेकॉर्डिंग केले
नंतर संगीतकार चंद्रमोहन हंगेकर यांनी तर त्यांच्या रेकॉर्डिंग स्टूडिओत माझे माझ्याच आवाजात कवीतांचे रेकॉर्डिंग करून ऑडियो कैसेट देखील काढल्या . हेच माझ्यासाठी खुपच महत्वाचे होते . पुढे हंगेकर तसेच अनेक जाणकारांशी चर्च्या होत राहिली . चंद्रमोहन हंगेकर मला म्हणाले ‘” तुम्हाला कविवर्य द.वि. केसकर माहिती आहेत कां ?
ज्यांनी ” घरात हसरे तारे असता , पाहु कशाला नभाकडे । ” हे गाणे लिहिले आहे . ते वाईलाच असतात . मी लगेचच द. वि. केसकर सरांना फोन करून वाईला त्यांच्या घरी गेलो. उभयतांनी अगदी प्रसन्नतेन माझं स्वागत केले . माझी १ तास १० मिनिटांची ऑडियो कैसेट अगदी तन्मयतेंन डोळे मिटून ऐकली . म्हणाले ” सातपुते तुमचे शब्दच मला चोरुंन घ्यावेसे वाटतायत !!!…
मलाही आश्चर्य वाटले . पुढे त्यांचे माझे अत्यंत घनिष्ट संबन्ध झाले . आमचे एकमेकांचे कड़े येणे जाणे सुरु झाले . माझे कवीतांचे हस्तलिखित त्यांनी पाहिले काही बदलही सूचविले .आणी पुस्तक प्रकाशित करावयाचे ठरले देखील … त्यासाठी गुरुवर्य कै. शांताबाई शेळके यांचीही प्रस्तावना घ्यायचे ठरले . त्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जयराम देसाई यांच्या मुळे मला शांताबाई यांचे कड़े मुक्त प्रवेश मिळाला . शांताबाईंनी मला माझे चौथे पुस्तक *आत्मरंग* या पहिल्या काव्यसंग्रहाला खुपच छान मुक्त प्रतिक्रियात्मक प्रस्तावना दिली . विशेष म्हणजे या *आत्मरंग* या काव्यसंग्रहाला माझे गुरुवर्य कै.प्राचार्य दा. सी . देसाई , कै.प्राचार्य बलवंत देशमुख , एडवोकेट डॉ. डि.व्ही. देशपांडे तसेच अनेक मित्रानी अत्यंत सुंदर परीक्षणात्मक प्रस्तावना दिल्या आहेत ..हे सारेच माझ्या कवीतां पेक्षाही ज्यास्त सुंदर आहे ..
कै. द.वि. केसकर. कै. शांताबाई शेळके , गुरुवर्य दा.सी.देसाई सर क़ै . बलवंत देशमुख सर असे मार्गर्शक गुरुवर्य मला या साहित्य क्षेत्रात लाभले हेच माझे अहोभाग्य !!! आणी या सर्वांचे मुळेच मी आज जो काही आहे तो !!!!
सातारचे ग्रामीण कवी डॉ . भाऊसो कणसे हे माझे सायन्स कॉलेजमधील मित्र बेंचपार्टनर यांचाही ” *ख्यांगाट* नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित कै. शांताबाईंशी शेळके यांच्या हस्ते झाला होता. माझा व गुरुवर्य शांताबाईं यांचेशी खुपच छान परिचय होताच .त्यामुळे सातारला माझे घरी त्याही येत असत . द.वि. केसकर सर पण नेहमी माझ्या घरी येत असत . व्यवसायानिमित्त माझे पुण्यातही डेक्कन वर पुलाच्यावाडीत ऑफिस असल्यामुळे एकदिवसाआड मी पुण्यास येणे जाणे असे . प्रत्येक वेळी सातारहून येतांना किंवा सातारला परत जाताना मी शांताबाईं यांची आवर्जून त्यांच्या सातारारोड पुणे येथिल निवास स्थानी भेट घेत असे. खुप आठवणी आहेत . त्यांचेही खुपच मार्गदर्शन मला लाभले . थोरामोठ्यांच्या सहवासात लाभलेले मार्गदर्शन हे खुपच अभ्यासात्मक व मोठे असते.त्यांच्याच घरात एका बैठकीत माझी एक रचना कै. शांताबाई यांनी ऐकली तेंव्हा त्या रचनेतील एक शब्द त्यांनी मला बदलण्यास सांगितले ,तो शब्दबदल मी केला तेंव्हा त्या रचनेची उंची एकदम वाढली. असा सहवास लाभणंही एक दैवयोग असतो.
या साऱ्या आठवणी विस्तृत्व स्वरुपात मी माझ्या आत्मकथनात (आत्मचरित्रात) लिहित आहेच . कै. द.वि.केसकर सरांच्या मुळ ज्येष्ठ संगीतकार दत्तभक्त कै. नंदूजी होनफ यांचाही खुप छान परिचय झाला , माझे व्यवसायानिमित्त मुंबईला सातत्याने येणे ,जाणे , रहाणे होत असे त्यामुळे मुंबईत देखील दुरदर्शनशी संबंध आल्यामुळे अनेक कलाकारांनाही भेटण्याचा योग आला. मीही दत्तभक्त असल्यामुळे नंदूजी व मी एकत्र गाणगपुर , नरसोबाची वाडी , औदुंबर , सज्जनगड , चाफळ , गोंदवले येथे बरोबर गेलो होतो . त्याचप्रमाणे ज्येष्ठ संगीतकार क़ै. यशवंतजी देव यांचेही बरोबर मुंबई मद्धये बरेच वेळ गांठी भेटी झाल्या , बरेच वेळ मी व ते मुंबई पुणे एकत्र आलो त्यांचाही खुप सहवास लाभला .
कै. द.वि.केसकर हे सर्वश्रुत ज्येष्ठ व्यक्तिमत्व होते . साहित्य क्षेत्रात त्यांचा परिचय मोट्ठा होता . त्यांच्यामुळे संगीतकार राहुल घोरपड़े , कै . संगीतकार विलास आडकर ,कै. अशोक काळे यांचाही माझा परिचय झाला होता , कै. विलास आडकर यांनी माझ्या 3 रचनांना चाली लावल्या. आपली गीते गायली जावू शकतात हा आनंद मला खूपच मोठ्ठा होता. मा. अशोक पत्की यांचाही दवि सरांचा दृढ़ परिचय होता . आम्ही त्यांचे कड़े जाण्याचे ठरले होते . पण आज तागायत मला अजुनही मा. अशोक पत्की यांना भेटण्याचा योग आला नाही . मात्र कै. यशवंतजी देव यांना मात्र बरेच वेळ भेटणे झाले. माझे परमज्येष्ठ स्नेही कविवर्य श्री. सुधारपंत देशपांडे यांचा ” बकुळगंध ” हा काव्यसंग्रह मीच छापला होता . त्याचे प्रकाशन उद्यान प्रसाद कार्यालयात पुण्यात झाले होते ,तेंव्हा मी व द.वि. केसकर उपस्थित होतो . व त्या दिवशी कै. यशवंतजी देव यांचा मुक्काम सुधाकरपंतांच्याच घरी होता . कार्यक्रम झाल्यानंतर त्यांच्या घरी पुण्यातील अनेक गायक , संगीतकार , हे कै. यशवंतजीना भेटण्यास आले होते .त्यावेळी सौ करुणा देव पण त्यांच्या सोबत होत्या . आम्ही त्या दिवशी सुधाकरपंतांच्याच घरी मुक्कामास ,जेवणासही एकत्र होतो. कविवर्य सुधाकरपंत देशपांडे यांच्यामुळे माझा कै गजाननराव वाटवे, कै.सुधीर मोघे , कै. गंगाधर महांबरे अशा अनेक दिगग्ज प्रभृतींचा परिचय झाला. या साऱ्या अविस्मरणीय आठवणी आहेत…हे सारे मी माझ्या आत्मकथनामध्ये लिहीत आहेच.या सर्वांच्याच लाघवी सहवासामुळे माझे जीवन समृद्ध झाले हा ही एक दैवयोग म्हणावा लागेल ..!!!
उर्वरित आठवणी पुढील भागात क्रमशः …….नमस्कार .
*©विगसा*
9766544908
आज पुणे मुक्कामी .
Leave a Reply