कृष्णासम ही नटखट अवखळ..
लाघवी कवीता हळूच पाऊली येते..
मयुरपिसी मखमली मृदुल करांनी..
अवघे अलगदी चित्त चोरुनी नेते ..।।१।।
कदंब तरुच्या साऊलीत या
साक्षात बीज प्रतिभेचे फूलते…
शब्दफुलांच्या , वटवृक्षावर
भावगंधले गीत कोकिळा गाते…।।२।।
कालिंदीच्या ! डोहातूनी त्या
लय , ताल सप्तसुरांची येते…
राधे ! बघ सामोरी कृष्णमुरारी
धुन मंजुळ मंजुळ बासुरीची येते…।।३।।
शब्दशब्द मनी भाव उमलता
वास्तव ! हॄदयातूनी ओघळते
रसिक मनांच्या गाभाऱ्यातुनी
सोज्वळतेचे रूप ! गंधाळूनी जाते…।।४।।
© वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना :- क्र..३९
दिनांक :- १४-३-२०२१.
Leave a Reply