रणजितसिहजी विभाजी जडेजा यांचा जन्म 10 सप्टेंबर 1872 रोजी काठेवाड येथील नवाबनगर येथे राजघराण्यात झाला. ते 10 ते 11 वर्षाचे असताना त्यांचा क्रिकेट या खेळाशी परिचय झाला. त्यांचे शिक्षण ज्या शाळेमध्ये झाले त्या शाळेमधील क्रिकेट टीमचे ते कप्तान 1884 साली झाले. 1888 पर्यंत त्यांचा कप्तानपदी ते होते. त्यावेळी त्यांनी शतक केले होते परंतु त्या काळात इतकी प्रतिष्ठा आपल्या देशात क्रिकेटला नव्हती जितकी प्रतिष्ठा इंग्लंडमध्ये होती. त्यांनी देखील क्रिकेट हा खेळ जास्त गांभीर्याने घेतला नव्हता परंतु ते टेनिस खेळणे मात्र पसंत करत होते.
त्यांचे शालेय शिक्षण संपल्यावर आणि ते पुढील शिक्षणासाठी इंगलंडला केंब्रिज विद्यापीठामध्ये गेले. मार्च 1888 मध्ये ते इंग्लंडला गेले तेव्हा त्यांनी सरे काउंटी क्रिकेट क्लब विरुद्ध त्यावेळी इंग्लंडला टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा सामना बघीतला आणि ते प्रभावित झाले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज चार्ल्स टर्नर याने केलेले शतक पाहूनही ते प्रभावित झाले. अशी उत्तम इनिंग मी दहा वर्षात बघितली नाही असे रणजितसिहजी म्हणाले. 1890 मध्ये रणजितसिहजी तेथे त्यांचे नाव बदलले ” के. एस. रणजितसिहजी ” म्हणजे ” कुमार श्री रणजितसिहजी “.
आधी त्यांना टेनिस आवडायचे परंतु 1888 मध्ये सामना भीतल्यावर त्यांनी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. 1889-90 मध्ये तेथे ते स्थानिक क्रिकेट खेळले. परंतु बॉऊर्नमाऊथ मध्ये राहिल्यावर त्यांनी त्यांचा क्रिकेट खेळण्यांमध्ये सुधारणा केली. जून 1891 मध्ये त्यांनी केंब्रिजशायर काउंटी क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. सेप्टेंबरपर्यंत बरेच सामने खेळले. त्यावेळी त्यांच्या सर्वात जास्त नाबाद 23 धावा होत्या. परंतु त्यांचे साऊथ ऑफ इंग्लंडच्या टीममध्ये समावेश झाला तो स्थानिक सामने खेळण्यासाठी . त्या सामन्यात त्यांनी सर्वात जास्त 34 धावा काढल्या. त्यावेळी त्यांच्या दृष्टीने सर्वच वातावरण नवे होते म्हणून त्यांना सूर गवसत नव्हता. त्यानंतर 1892 मध्ये ते केंब्रिज विद्यापीठाकडून खेळले. दोन सामने खेळले परंतु जॅक्सन यांच्या मते ते त्यांचे खेळणे त्यांना फर्स्ट क्लास क्रिकेटसाठी दरवाजे उघडून देणारे नव्हते. अर्थात जॅक्सन यायचे वागणे बरोबर नव्हते कारण त्यांनी रणजितसिहजीची क्षमता ओळखली नव्हती हेच खरे.
तर दुसरीकडे त्यांच्या वडिलांनी त्यांना पैसे पाठवणे बंद केले कारण ते त्यांची कायद्याची परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्या वडिलांनी त्यांना परत भारतात बोलवले पण ते गेले नाहीत ते तेथेच राहिले. पुढे ते 1894 मध्ये काऊंटी सामना खेळले. एम.सी.सी. च्या विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी नाबाद 77 धावा पहिल्या इनिंगमध्ये केल्या आणि 6 विकेट्सही घेतल्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी शतक केले. 155 मिनिटामध्ये त्यांनी 150 धाव केल्या आणि त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला. त्यांनी ता सीझनच्या शेवटी 49.31 च्या सरासरीने 1,775 धावा केल्या.
परंतु नवीन सिझन सुरु होण्यापूर्वी त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांचा 12 वर्षाचा भाऊ त्यांच्या गादीवर बसला म्हणजे महाराज झाला. त्यावेळेला रणजितसिहजी ससेक्सकडुन एम.सी.सी. विरुद्ध खेळत होते.
रणजितसिहजीनि त्यांचा पहिला कसोटी सामना 16 जुलै येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला . पहिल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 62 धावा केल्या त्या इनिंगमध्ये त्या सर्वाधिक धावा होत्या. तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 154 धावा केल्या. प्ररंतु हा सामना ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने जिंकला. त्यानंतर ते इंग्लंडकडून खेळू लागले परंतु तेथे त्यांचे अनेकवेळा मतभेदही होऊ लागले. 1896 मध्ये त्यांची प्रसिद्धी खूप वाढू लागली होती. विझडेनने ‘ विझडेन क्रिकेटिअर ऑफ द इअर 1896 ‘ मध्ये देऊन त्यांचा सन्मान केला.
रणजितसिहजी यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 24 जुलै 1902 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर येथे खेळला. त्यांवेळी त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 2 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 धावा केल्या होत्या. त्यांनी 15 कसोटी सामन्यात 44.95 च्या सरासरीने 989 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी 2 शतके आणि 6 अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या होती 175 धावा तसेच त्यांनी 13 झेलही घेतले. त्यांनी 307 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 24,692 धावा केल्या त्या 56.37 च्या सरासरीने त्यामध्ये त्यांनी 72 शतके आणि 109 अर्धशतके केली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद 285 धावा तसेच त्यांनी 133 विकेट्सही घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 53 धावा देऊन 6 विकेट्स घेतल्या. तसेच 233 झेलही पकडले. त्यांच्या नावावर एक वेगळा रेकॉर्ड आहे. तो म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिल्यांदा त्यांनी एक सीझनमध्ये 3000 च्या वर धावा केल्या , त्यांनी 63.18 च्या सरासरीने 3,159 धावा केल्या त्यामध्ये त्यांनी आठ शतके केली.
अशा विक्रमी रणजितसिहजी यांचे 2 एप्रिल 1933 रोजी वयाच्या 61 व्या वर्षी जामनगर येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply