जॅकी चॅन म्हणजेच चॅन कॉग-संग याचा जन्म ७ एप्रिल १९५४ रोजी हॉगकॉग येथील व्हिक्टोरिया पिक विभागात झाला. त्याच्या वडिलांचे नाव चार्ल्स आणि आईचे ली-ली-चॅन . जॅकी चॅन चे टोपण नाव होते ‘ पाओ-पाओ ‘ म्हणजे ‘ कॅनॉनबॉल . तो लहानपणापासून अत्यंत उत्साही होता. त्याने लहानपणी शालेय शिक्षणात फार प्रगती केली नाही. तो पहिल्याच वर्षी नापास झाल्यावर त्याला चायना ड्रामा अकॅडमीमध्ये टाकले . त्याआधी वयाच्या ५ व्या वर्षी त्याने बालकलाकार म्ह्णून कामे केली. वयाच्या ८ व्या वर्षी त्याने’ बिग अँड न लिटल वोन्ग ‘ ह्या चित्रपटात १९६२ साली काम केले. त्यानंतर त्याने चित्रपटात लहान लहान कामे केली.
वयाच्या सतराव्या वर्षी त्याने ब्रूस ली च्या ‘ फिस्ट ऑफ फ्यूरी ‘ आणि ‘ एंटर द ड्रॅगन ‘त्याने मध्ये स्टंटमन म्ह्णून काम केले. एटर द ड्रॅगन मध्ये तो ब्रूस ली बरोबर फाईट करताना दिसतो. पुढे त्याने अनेक चित्रपटात कामे केली . रश अवर , पोलीस स्टोरी , शांघाय नून , शांघाय नाइट्स अशी कित्येक नावे घेता येतील. तो अनेक वेळा स्टंट करताना जखमीही झालेला आहे.
लहानपणी त्याला गाण्याची आवड होती. तो लहानपणी ‘ पेकिंग ऑपेरा स्कूल ‘ मधून त्याने संगीतातले धडे घेतले होते. पुढे त्याने गाण्याचे २० अल्बम्स केले , अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम केले. १९९६ साली त्याला डॉक्टरेट ऑफ सोशल सायन्स ही हाँगकाँग विद्यापीठाची डिग्री मिळाली, तसेच कंबोडिया विद्यापीठाने त्याला सन्माननीय प्रोफेसरशिप दिली. त्याला १२ नोव्हेंबर २०१६ या दिवशी त्याला ‘ सन्मानीय ‘ म्ह्णून ऑस्कर अवॉर्ड देण्यात आले. जॅकी चॅन ही चवथी व्यक्ती आहे की जिला ‘ सन्मानीय ‘ म्ह्णून ‘ ऑस्कर अवॉर्ड ‘ दिले गेले आहे. .
अशा या जॅकी चॅनला तो भारतात आला तेव्हा मला भेटण्याचा आणि त्याची स्वाक्षरी घेण्याचा योग आला.तो एक मोठा किस्साच आहे . तेव्हा वाटले मला प्रत्यक्ष ब्रूस ली ला बघता नाही आले पण जॅकी चॅनला जवळून बघता आले हे काही कमी आहे.
आजही जॅकी चॅन येणाऱ्या पिढीवर त्याच्या मार्शल आर्टची भुरळ पाडत आहे.
सतीश चाफेकर
Leave a Reply