नवीन लेखन...

दिग्दर्शक शक्ती सामंता

शक्ती सामंता यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी पूर्व बंगालमध्ये झाला. त्यांचे शिक्षण डेहराडूनला त्यांच्या काकांकडे झाले. त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण कोलकता विद्यापीठातून पुरे केले. त्यांना हिंदी सिनेमात अभिनेता म्हंणून काम करायचे होते. त्यासाठी ते मुबंईला आले आणि मुंबईपासून २०० किलोमीटरवर असणाऱ्या दापोली येथे एका शाळेत शिक्षकाची नोकरी करू लागले.

पूढे १९४८ मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते सहदिग्दर्शक म्ह्णून . शक्ती सामंता यांनी सतीश निगम ह्यांचे सहदिग्दर्शक म्ह्णून राजकपूरच्या ‘ सुनहरे दिन ‘ मध्ये काम केले. त्याचबरोबर त्यांनी ग्यान मुखर्जी आणि फणी मुजुमदार यांच्याकडेही सहदिग्दर्शकाचे काम केले त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या तमाशा, बढपन आणि धोबी डॉक्टर हे चित्रपट केले .

१९५४ साली त्यांनी ‘ बहू ‘ नावाचा चित्रपट स्वतंत्रपणे बनवला त्यामध्ये करण दिवाण, उषा किरण , शशीकला आणि प्राण हे कलाकार होते. ह्या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी इन्स्पेक्टर , शेरू , डिटेक्टिव्ह आणि हिल स्टेशन हे चित्रपट बनवले. १९५७ मध्ये शक्ती सामंता यांनी स्वतःची फिल्म कंपनी काढली. ‘ आराधना ‘ च्या वेळची गोष्ट आहे . शक्तीदांच्या चित्रपटात आत्तापर्यंत शंकर-जयकिशन , ओ . पी. नय्यर यांनी संगीत दिले होते परंतु आराधनाच्या वेळी पैशाची तंगी होती म्ह्णून शक्तिदा एस . डी. बर्मन यांच्याकडे गेले . एस. डी बर्मन याना कळले की शक्तिदा यांच्याकडे पैसे कमी आहेत म्ह्णून ते त्यांच्याकडे आले . एस. डी . बर्मन म्हणाले तुमच्याकडे पैसे कमी आहेत म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात नाहीतर शंकर- जयकिशन आणि इतरांकडे गेला असता. शेवटी शक्तिदानी त्यांची समजूत काढली तेव्हा एस. डी. बर्मन म्हणाले मी आधीच्या चित्रपटाचे ७०, ००० रुपये घेतले होते तुमच्याकडून तितकेच घेणार , एकही पैसा कमी नाही . तेव्हा शक्तिदा म्हणाले मी तुम्हाला पैसे देणार पण एक लाख रुपये देईन पण गाणी हिट झाली पाहिजेत . हे ऐकून एस. डी . बर्मन खूष झाले आणि खरोखरच ‘ आराधना ‘ ची गाणी आजही हिट आहेत. शक्ती सामंता यांनी शम्मी कपूर , राजेश खन्ना यांना घेऊन अनेक हिट चित्रपट केले त्यातील गाणी , कथा , सवांद आजही अनेकांना आठवतात . ‘ अमर प्रेम ‘ हा त्यांचा चित्रपट कुणीच विसरू शकत नाही. त्यातील गाणी , संवाद आणि कथा इतकी जबरदस्त आहे की नवीन पिढी त्यांची देखील पंचविशी उलटल्यांनंतर हे चित्रपट बघते बघते ? कारण खरे चित्रपट कोणते हे त्यांना त्यावेळी कळते . शक्ती सामंता यांचा ‘ मेहबूबा ‘ चित्रपट आणि त्यातली गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत . मेहबूबाची कथा ही त्यांच्या मित्राच्या आयुष्यात घडलेली आहे असे त्यांनी एका ठिकाणी म्हटलेले आहे. ‘ हावडा ब्रिज ‘ मधील ‘ आईए मेहेरबांन….बैठीये जानेजा ‘ ओ . पी . नय्यर यांनी संगीत दिलेले हे गाणे आशा भोसले यांनी मधुबालालासाठी गायले होते. आजही हे गाणे ताजे आहे . अशी अनेक गाणी शक्ती सामंता यांनी हिंदी चित्रपटसृष्टीलादिली . शक्तीदानी सर्व चित्रपट दिले ते सर्वसामान्य माणसांसाठी हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातील गाणी , संगीत सहजपणे लोकांच्या ओठावर खेळते रहाते. साधी गोष्ट आहे आजही कॉलजमधील मुले-मुली पिकनिकला ज्या गाण्याच्या भेंड्या खेळतात त्यात जास्त गाणी कुठली असतात ह्याचे कुठल्या समीक्षकाने निरीक्षण केले आहे का ? शक्तिदानी चित्रपट मूठभर लोकांसाठी नाही बनवले. सर्वांसाठी बनवले. शम्मी कपूर , राजेश खन्ना यांचे सर्व गाजलेले चित्रपट त्यांचे आहेत परंतु अमिताभ बच्चनला मात्र फारसे स्टारडम त्यांच्या चित्रपटामुळे नाही मिळाले .एन इव्हनिंग इन पॅरिसच्या वेळी शम्मीकपूर सहज म्हणाला होता उद्याच्या शूटिंगला जर हेलिकॉप्टर मिळाले तर धमाल येईल . दुसऱ्याच दिवशी शक्तिदानी हेलिकॉप्टर मागवले आणि गाणे शूट झाले , ‘ आसमान से आया फरिश्ता …’ . शक्तिदा खऱ्या अर्थाने एन्टरटेनर होते असेच म्हणावे लागेल. थकलेला , कष्टकरी सामान्य माणूस आणि तरुण पिढी त्यांचे खरे प्रेक्षक असल्यामुळे ते चित्रपट , त्यातील नायक-नायिका , गाणी सर्वच हिट झाले. चायना टाऊन , कश्मीर की कली , सिंगापूर , कटी पतंग , बरसात , दुश्मन , एन इव्हनिंग इन पॅरिस , अमानुष हिंदी आणि बंगाली. अमानुषमधील उत्तम कुमार , शर्मिला टागोर आणि उत्पल दत्त यांना कोणीही विसरू शकत नाही. शक्तिदानी जवळ जवळ अडतीस ते चाळीस चित्रपट केले त्यातील खूप चित्रपट चालले , हिट झाले. शक्तिदाचा अनुराग हा वेगळाच चित्रपट होता . जेव्हा अशॊकुमार यांनी त्याची कथा आइकली तेव्हा हा चित्रपट कसा चालेल याबद्दल ते साशंक होते कारण त्याचे कथानक वेगळे होते. पण तो चित्रपट जबरदस्त चालला , त्याला अवॉर्डही मिळाले.

शक्ती सामंता यांच्या आराधना , अमानुष , अनुराग या चित्रपटांना फिल्मफेअर अवॉर्ड्स मिळाले. इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनचे ते पाच वर्षे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक मोठी हुद्द्यांची पदे भूषवली.

९ एप्रिल २००९ या दिवशी शक्ती सामंता यांचे मुबंईत निधन झाले , हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्वाचा ‘ एन्टरटेनर ‘ काळाच्या पद्याआड गेला.

— सतीश चाफेकर

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..