रिची बेनॉ यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९३० रोजी ऑस्ट्रेलिया मधील न्यू साऊथ वेल्स येथे झाला. त्यांच्या कुटूंबामध्ये क्रिकेट खेळले जात होते. त्यांचा मोठा भाऊ जॉन बेनॉ हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामने खेळलेला होता. त्यांचे वडील लेग स्पिनर होते. ते पेनरीथ क्रिकेट क्लबकडून खेळात होते. त्यांनी सेंट मेरी च्या विरुद्ध ६५ धावा केल्या होत्या आणि त्याचप्रमाणे २० विकेट्सही घेतल्या होत्या. त्यांच्या सानिध्यात बेनॉ मोठे होत होते , लेग ब्रेक गुगली कसे टाकायचे हे त्यांच्याकडून शिकले . वयाच्या १६ व्या वर्षी ते कुबेरलँडकडून फलंदाज म्हणून खेळू लागले.
नोव्हेंबर १९४८ मध्ये वयाच्या १८ व्या वर्षी रिची बेनॉ न्यू साऊथ वेल्स च्या स्टेट टीमसाठी निवडले गेले. क्वीन्सलँड विरुद्ध खेळताना त्यांनी नाबाद ४७ धावा केल्या आणि ३७ धावांमध्ये ३ विकेट्स घेतल्या. महत्वाचा फलंदाज म्हणून फर्स्ट क्लास क्रिकेटचा पहिला सामना क्वीन्सलँड विरुद्ध न्यू साऊथ वेल्स कडून सिडने क्रिकेट मैदानावर खेळला .त्याच्या करिअरच्या सुरवातीला रिची बेनॉ आलं राऊंडर म्हणून खेळत होता.
१९५१-५२ च्या सिझनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना रिची बेनॉ ने ९६ धावांमध्ये ७ विकेट्स घेतल्या आणि एक तासामध्ये शंभर धावांची भागीदारी केली , त्यामध्ये त्यांनी ४३ धावा केल्या. ऑस्ट्रलियाने त्याना उत्तर देताना १३४ धावा केल्या आणि सामना गमावला . पुढच्या सामन्यामध्ये रिची बेनॉने सौथ ऑस्ट्रेलिया विरुद्ध ११७ धावा केल्या.
साऊथ आफ्रिकेविरुद्ध खेळताना एक फलंदाजाने कट मारताना चेंडू बेनॉच्या तोंडावर लागला तेव्हा ते शॉर्ट गलीला फिल्डिंग करत होते .त्यामुळे ओठ आणि हिरड्या यांना जखमा झाल्या त्यामुळे त्याच्या चेहऱ्यात फरक पडला होता आणि ह्या सामन्यानंतर त्यांचे लग्न झाले ते बँडेज असतानाच.
रिची बेनॉ हे स्पिनर आणि गुगली टाकत होते परंतु ते चेंडूला फ्लाइट द्यायचे आणि त्याचबरोबर योग्य दिशा देत असत त्यामुळे समोरचा फलंदाज सतत दडपणाखाली असायचा. ते आजच्या शेर्न वॉर्न अँशले गिल्स प्रमाणे अराउंड द विकेट टाकायचे . त्याचपप्रमाणे ते त्या काळामध्ये अत्यंत प्रभावी क्लोज फिल्डर होते.
रिची बेनॉ यांनी त्यांचा पहिला कसोटी समान २५ जानेवारी १९५२ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला तर शेवटचा सामना १२ फेब्रुवारी १९६४ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला . त्यांच्या बारा वर्षाच्या कसोटी कारकिर्दीत ६३ कसोटी सामन्यांमध्ये २२०१ धावा केल्या त्यामध्ये तीन शतके आणि ९ अर्धशतके होती. त्यांची कसोटी समान्यांमधील सर्वोच्च धावसंख्या होती १२२. बेनॉ यांनी २४८ विकेट्सही घेतल्या. त्यामध्ये १६ वेळा एका इनिंगमध्ये ५ किंवा ५ पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या तर एका सामन्यांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये ७२ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या होत्या त्याचप्रमाणे त्यांनी ६५ झेलही पकडले.
रिची बेनॉ यांनी २५९ फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यांमध्ये ११, ७१९ धावा केल्या त्यामध्ये त्यांनी २३ शतके आणि ६१ अर्धशतके केली. फर्स्ट क्लास विकेट्स मध्ये ९४५ विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स त्यांनी ५६ वेळा घेतल्या तर ९ वेळा एका डावामध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या. तर एका इनिंगमध्ये १८ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या. बेनॉ यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २५४ झेल पकडले.
ते ऑस्ट्रलियाचे कप्तान असताना २८ कसोटी सामन्यामध्ये १२ वेळा जिकंले ४ वेळा हरले ११ वेळा सामने अनिर्णित राहिले आणि एक सामना बरोबरीत सुटला हा सामना क्रिकेट जगतातील पहिला बरोबरीत सुटलेला सामना होता.
रिची बेनॉ यांची पुढील कारकीर्द समालोचक म्हणून गाजलीच ती त्याच्या स्पष्टवक्तेपणा मुळे . त्यांचे उच्चार अत्यंत वेगळे असत कदाचित तोंडाला चेंडू लागल्यामुळेही असेलही मात्र त्यांचे उच्चार ऐकताना मजा येत असे. मला त्यांना मुंबईमध्ये जेव्हा वर्ल्ड कपचा सामना झाला तेव्हा भेटता आले. मी त्यांना त्यांच्या वाढदिवसाला पत्रही पाठवत असे आणि ते उत्तरही देत असत. एकदा त्यांनी त्यांच्याबरोबर चॅनेलवर असणाऱ्या सर्वांच्या स्वाक्षऱ्या पाठवल्या होत्या त्यामध्ये बिल लॉरी आणि इयान चॅपल बरोबर इतरांच्याही स्वाक्षऱ्या होत्या. रिची बेनॉ यांनी अनेक पुस्तकेही लिहिली होती.
ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यामुळे त्यामुळे त्यांना जखमा झाल्या होत्या परंतु ते त्यातून वाचले . त्यामुळे ते २०१३-१४ मध्ये अँशेससाठी समालोचन नाही करू शकले.
पुढे वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांना स्किन कॅन्सरचे निदान झाले आणि १० एप्रिल २०१५ रोजी त्यांचे झोपेतच निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply