अँजेलो मॅथ्यूजचा जन्म २ जून १९८७ रोजी झाला.
अँजेलो मॅथ्यूजचा फलंदाज म्हणून ठसा असला तरी त्याने सर्वोत्तम गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात केली. अँजेलो मॅथ्यूजने २००९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. काँपॅक कपमधील (२००९) तिसऱ्या लढतीत यजमानांच्या ३०८ धावांच्या मोठया आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १६८ धावांत संपला.
मध्यमगती अँजेलोने २० धावांत सहा विकेट घेत श्रीलंकेच्या सहज विजयात मोलाचा वाटा उचलला. २०१० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी वनडेत नवव्या विकेटसाठी लसित मलिंगाससह विश्वविक्रमी १३२ धावांची भागीदारी करताना मॅथ्यूजने श्रीलंकेला एका विकेटने सवोत्तम विजय मिळवून दिला होता.
अँजेलो मॅथ्यूजने ८० कसोटी सामन्यांत ३० अर्धशतके आणि ९ शतकांच्या मदतीने ५५५४ धावा केल्या आहेत… तसेच ३३ विकेट्स घेतले आहेत. २०५ एकदिवसीय सामन्यांत ३७ अर्धशतके आणि २ शतकांच्या मदतीने ५३८१ धावा केल्या आहेत आणि ११४ विकेट्स घेतले आहेत.
अँजेलो मॅथ्यूजच्या नेतृत्वातच लंकेने इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकण्याचा भीम पराक्रम केला होता. अँजेलो मॅथ्यूज २०१७ मधील सत्रात दिल्ली डेअरडेव्हीस संघातूनआपीएल खेळला होता. त्यावेळी त्याला केवळ तीन सामने खेळता आले. २०१८ च्या आयपीएलच्या लिलावात त्याला कोणी खरेदीदार मिळाला नव्हता.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
संदर्भ: इंटरनेट.
Leave a Reply