बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला.
कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रकार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या , ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती. त्यांचे काही लिखाण ’गोपीनाथ’ या टोपणनावाने केलेले आहे. ते आनंद मासिकाचे संपादक पण होते.
आकाशवाणीवरील बालप्रिय बालोद्यान या कार्यक्रमातील नाना म्हणजेच गोपीनाथ तळवलकर. तळवलकर हे पुणे केंद्रावर बालविभागप्रमुख होते. बालोद्यान हा मुलांचा कार्यक्रम ते आयोजत. रंजन व उद्बोधन यांचा सुरेख मिलाफ आणि बालकलाकारांचा सहभाग यामुळे ‘बालोद्यान’ कार्यक्रम त्या काळात फार लोकप्रिय झाला होता.
गोपीनाथ तळवलकर यांचे ७ जून २००० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply