नवीन लेखन...

युरो-गंध

Euro Gandh

कृपा-प्रसाद गुरुमाऊलीचा मज लाभला ।
तयाच्याच मर्जीने, लेखनाचा योग साधला ।।
गेलो लिहीत मी, जे जे भावले माझ्या मनाला ।
वाचावे तेवढेंच, रुचेल जेवढे, तुमच्या मनाला ।।
वाचावे तेवढेंच, रुचेल जेवढे, तुमच्या मनाला ।।

रंग लेवुनि युरोप यात्रा मनांत रुजली ।
स्मृती कोंदणीं, अलगद जाऊनी ठसली ।।
स्मृती कोंदणीं, अलगद जाऊनी ठसली ।।धृ।।

आंस उसंत ती होती दडली, वर्षावर्षांची ।
नव्हती गवसत संधी, मज युरोपवारीची ।।
वर्षांमागुनी वर्षें सस्तां, होई उलघालमनाची
गुरुकृपेने आली घटिका युरोपगमनाची ।।
गुरुकृपेने आली घटिका युरोपगमनाची ।।१।।

शहर रोम जुन्या पुराण्या भग्नावशेषांचे ।
जपले यत्नें, तयांनी अवशेष पुराणकाळाचे ।।
कोलोसियम ठिकाण हे, सम्राटी विलासाचे ।
खेळवुनि कैदी पशुंशी, नर संहारी रमण्याचे ।।
खेळवुनि कैदी पशुंशी, नर संहारी रमण्याचे ।।२।।

रोम रोमांत अमुच्या, रोम पुरते मुरले ।
गतकाळाचे ते वैभव देखुनि, नेत्र तोषले ।।
उदास सारे आम्ही, वारसा जपण्यां येथे ।
चरण्या पायीं, वेळतरी, आम्हां आहे कोठे ? ।।३।।

नगर व्हॅटिकन पवित्र भूमी ख्रिस्ताबांधवांची ।
म्युझियम व्हॅटिकन, भरारी विराट भव्यतेची ।।
“फ्रेस्कीज” मालिका ओल्या मिळाव्यांवरिष्ठ चित्रांची ।।
ठसली मनीं चित्रे, मायकेल एंजेलो कलेची ।
ठसली मनीं चित्रे, मायकेल एंजेलो कलेची ।।४।।

झुकुनि वंदी, टॉवर पिसा सार्‍या जगताला ।
वास्तु विशारदांनी लावले कौशल्य पणाला ।।
स्क्वेअर ऑफ मिरॅकल, चकित करी विश्वाला ।
मनी वंदिले, पिसा झुलविणार्‍या विशारदाला ।।
मनी वंदिले, पिसा झुलविणार्‍या विशारदाला ।।५।।

“व्हेपोरेटो” हुनि नौका विहार व्हेनिस बेटाचा ।
भावाला ब्रीज ऑफ साय नि प्रसाद डॉगेजचा ।।
नौकेलुनि, देखिला दिमाख, बेल टॉवरचा ।
अनुभव अनोखा तो संत मार्कस्क्वेअरचा ।।
अनुभव अनोखा तो संत मार्कस्क्वेअरचा ।।६।।

मनांस भुलवी “गोंडोला” ची गोंडसवारी ।
नजरेंत मराठी, पाण्यावरती व्हेनिस नगरी ।।
मनीं जागली स्मृती “मर्चंट ऑफ व्हेनिसची”।
वंदिली अंतरी, प्रतिभाच्या शेक्सपियरची ।।
वंदिली अंतरी, प्रतिभाच्या शेक्सपियरची ।।७।।

“वॅटसन” नगरी ——— भान हरपले ।
म्युझियमींच्या, रत्नमंजुषांनी, वेड लाविले ।।
ठसली हृदयी स्वारोस्कीची अनमोल रत्ने ।
पाहिली, रत्नप्राप्तीची, सुरेल कल्पत स्वप्ने ।।
पाहिली, रत्नप्राप्तीची, सुरेल कल्पत स्वप्ने ।।८।।

स्पर्शिली जन्मभूमी संगीत सम्राट मोझार्टाची ।
भूमी दर्शिली ती, साऊंड ऑफ म्युझिक कथेची ।।
“लायनमॉन्युमेंट” देई स्मरण नर-शार्दुलांचे ।
क्षण होते, तयांना, मनोमनीं, वंदन करण्याचे ।।
क्षण होते, तयांना, मनोमनीं, वंदन करण्याचे ।।९।।

मनास भावला, निसर्ग-रम्य शाईन कॉल ।
सुरम्य देखुनि परिसर, झालो मी माला माल ।
“रिव्हॉल्व्हिंग कार” मधल्या, उत्तुंग भरारीतुनि ।
“टिटलिस” शोभा, अनुभविली उंचीवरुनि ।।
“टिटलिस” शोभा, अनुभविली उंचीवरुनि ।।१०।।

धवल अल्पसच्या शिखरीं, नजर भिरभिरे ।
गारण्यांतूनी, शरिरीं अवघ्या, भरे कापरे ।।
अंतरांतूनि, बेहद खूष आम्ही, निसर्गावरी ।
जरी श्वासामधुनि, जीवआमुचा, होता गॅसवरी ।।
जरी श्वासामधुनि, जीवआमुचा, होता गॅसवरी ।।११।।

“ट्रेन कॉगव्हिल” मधुनि, युरोप माथ्यावरती ।
“क्लॉईन शेडिंगीं”, रमले, निसर्गशोभे भवती ।।
खुणावीत होते, “ड्यंग क्रॉ”, शुभ्र शिमावस्ती ।
पाहुनि, “सिनरी अल्पाईन” झालो बेभान चिर्ची ।।
पाहुनि, “सिनरी अल्पाईन” झालो बेभान चिर्ची ।।१२।।

मनीं रुजला, लुसार्नेचा नौका-भोजन सोहळा ।
संचारला अंगी, स्वीस नृत्याचा, आवेश आगळा ।।
धुंद होऊनि, बेभान नाचलो, लेक लुसार्नी ।
आलो, मनीं घेऊनि, आनंदाच्या आलोट उर्मी ।।
आलो, मनीं घेऊनि, आनंदाच्या आलोट उर्मी ।।१३।।

“मॅडुरोडॅम” प्रतीकृती ती हॉलंड देशाची ।
कौशल्ये, केली तयांनी, निर्मिती कलाकृतींची ।।
कमाल तयांची, सारेच हुबेहुब टिपण्याची ।
मजा चाखिली, नौके मधुनि, अॅमस्टरडॅमची ।।
मजा चाखिली, नौके मधुनि, अॅमस्टरडॅमची ।।१४।।

नयनीं देखयिलें, सुरेल ट्युलिप्स तारवे ।
लग्नाआधीची, सल्लज प्रियतमा खास आठवे ।।
नाईलाज म्हणूनि, भार्येसह निमूट रहाणे ।
आठवते तिचे, नित्य रोजचे, मज दटावणे ।।
आठवते तिचे, नित्य रोजचे, मज दटावणे ।।१५।।

मनांस भावला ब्रुसेल्सचा तो झिझुविहार ।
परी, पैशांविना, कधी न मिळे आम्हां शिशुमंदीर ।।
बर्गर, पिझ्झा नि पास्ता यांच्याशीच इथे वास्ता ।
भिस्त ठेविली तयांवरी, नसतां दुसरा रस्ता ।।
भिस्त ठेविली तयांवरी, नसतां दुसरा रस्ता ।।१६।।

पॅरिस नगरी, खाणंही, सौंदर्य विलासाची ।
होतो जाणुनि मनीं, ख्याती या महा मायेची ।।
“कॅम्पस एलसीज्” नाट्यगृही, सोयभोजनाची ।
क्षुधेस मनींच्या, मेजवानी कॅबरे नृत्याची ।।
क्षुधेस मनींच्या, मेजवानी कॅबरे नृत्याची ।।१७।।

नयनीं पाहुनी, मस्त नशीले, धुंद कॅबरे ।
कावरेचि झाले, चित्तींबावरे, सारे नवरे ।।
झणीं देखतांच, भार्येची, ती नजर बेरकी ।
उरांत तयांच्या, आली भरूनि, खाशी धडकी ।।
उरांत तयांच्या, आली भरूनि, खाशी धडकी ।।१८।।

वॉल्ट सरांचाच अवतार तो, युरो डिझने ।
अबाल-वृद्धांसही, पसंत येथे विहरणे ।।
खाणे-पिणे नि राईडस् मधुनि आनंद घेणे ।
खेळ खेळुनि सारे, आयुष्याचा एम गाठणे ।।
खेळ खेळुनि सारे, आयुष्याचा एम गाठणे ।।१९।।

जपण्या स्मृती, स्वातंत्र्याच्या जन्मशताब्दीची ।
अन् ठेवुनि जाण, जनांच्या उत्कठ उर्मींची ।।
कोठी निर्मिती, अलौकिक, उत्तुंग टावरची ।
स्तुत्य ठरली, कला कृती आयफेल टॉवरची ।।
स्तुत्य ठरली, कला कृती आयफेल टॉवरची ।।२०।।

युरोस्टार, बुलेट ट्रेन ती सुसाट वेगाची ।
ललना लावण्यवती, दिल खेचक रचनेची ।।
लुटली मजा, पॅरिस-लंडनमार्गी, युरो-टनेलची।
स्तिमित करी, कल्पना त्या युरोस्टार मार्गाची ।।
स्तिमित करी, कल्पना त्या युरोस्टार मार्गाची ।।२१।।

“आय ऑफ लंडन” उत्तुंग झुला लंडनचा ।
निरखिला भू-भाग, समृद्ध आंगल भूमीचा ।।
भरारींतुनि मनां भावला, प्रताप बुद्धीचा ।
संथ राहुनि अंतरीं, टिपला क्षण सौख्याचा ।।
संथ राहुनि अंतरीं, टिपला क्षण सौख्याचा ।।२२।।

म्युझियमी लंडन त्या वस्तु गुलाम राष्ट्रांच्या ।
खेद वाटला मनांस, आपुल्याच खुळेपणाचा ।।
छंद तयांचा स्तुत्य, अनमोल वस्तु जपण्याचा ।
आहेत वल्गना आपुल्या, बेगडी देश-प्रेमाच्या ।।
आहेत वल्गना आपुल्या, बेगडी देश-प्रेमाच्या ।।२३।।

बिग बेन घडी, देई स्मरण, गतकाळाचे ।
स्ट्रीट ट्रॅफलगाराने, फेडिले पारणे नेत्रांचे ।।
वस्तुंनी गरजेच्या, मार्केट ते गजबजले ।
पिक-अ-डेली,“सर्कल पिकॅडेली” ते आवडले ।।
पिक-अ-डेली,“सर्कल पिकॅडेली” ते आवडले ।।२४।।

हृदयी जपला, वॅक्स संग्रह, तुसॉद ताईचा ।
छंद आगळा, नर-शार्दूलांस, मेणी जपण्याचा ।।
जों तो येथे निवडे, जोडीदार, आपुल्या स्वप्नींचा ।
ध्यास पुरा मी केला, मरलीन मनसे साथीचा ।।
ध्यास पुरा मी केला, मरलीन मनसे साथीचा ।।२५।।

ऑक्सफौर्डी देखियाला, इथला विद्येचा स्वर्ग ।
तोषलो अंतरी, जरी नव्हता तो आमुचा वर्ग ।।
अनुभविली गोर्‍यांची, शिस्त अतीव करडी ।
चालकाची गोर्‍या, पाळण्यावेळ, जो तो धडपडी ।।
चालकाची गोर्‍या, पाळण्यावेळ, जो तो धडपडी ।।२६।।

कॅसल विंडसर, राजेशाही नि आलीशान ।
राज वैभवें, फुलुनि खुलला, सुंदरसा छान ।।
विश्रामाचे महाराणीच्या शाही मानाचे स्थान ।
खरेंच. येथे विलसे, अलोट वैभवाची खाण ।।
खरेंच. येथे विलसे, अलोट वैभवाची खाण ।।२७।।

देश देश विहरलो, राष्ट्र प्रगत देखिली ।
नवनाविन्याची, येथे कांसलयांनी धरिली ।।
परिजुने जपण्यां सारे, कंबरही कसली ।
संगमी जुन्या-नव्याच्या, उत्तुंग प्रगती साधली ।।
संगमी जुन्या-नव्याच्या, उत्तुंग प्रगती साधली ।।२८।।

मार्गांवरती नसणे खड्डे, वैशिष्ट्य येथले ।
देशी अपुल्या खड्ड्यांमधुनि मार्ग शोधणे ।।
नितळ, सुबक, सुंदर ऐसे सुरेल रस्ते ।
पदोंपदीं स्मरती, अपुले खचलेले रस्ते ।।
पदोंपदीं स्मरती, अपुले खचलेले रस्ते ।।२९।।

लॉन विलसते, जागोजागीं मार्गांभक्ती ।
नजर भिर भिरे स्वानन्दे हिरवाई वस्ती ।।
उधळण ती, रंग फुलांची, नटांना तोषवी ।
मन मयूर माचू लागे, पाहुनि ते दृष्य लाघवी ।।
मन मयूर माचू लागे, पाहुनि ते दृष्य लाघवी ।।३०।।

नेत्रां सुखवी, एक सारखी, रचना वास्तुंची ।
नव्हते हॉर्न, जरी असे, वर्दळ मार्गांवरती ।।
टपर्‍या-ठेले नव्हते, सोय न कोठे पिचकारीची ।
किमया मोठी, टॉयलेट्स ही, स्वच्छ ठेवण्याची ।।
किमया मोठी, टॉयलेट्स ही, स्वच्छ ठेवण्याची ।।३१।।

शिस्त येथे, पाळणे सारे, नियम कायद्याचे ।
कर्तव्य जाणिती जन, करणे पालन नियमांचे ।।
घडते त्यांतुनि, दर्शन तयांच्या, देश प्रेमाचे ।
आपुल्या येथे, चिरी मिरींतुनि, यत्न सुटण्याचे ।।
आपुल्या येथे, चिरी मिरींतुनि, यत्न सुटण्याचे ।।३२।।

स्वच्छता जागो जागींची, देई मनां, प्रसन्नता ।
अपुल्या येथे, असे घडणार कधी, याची चिंता ।।
अलोट वैभव देखुनि, या सु-प्रगत राष्ट्रांचे ।
स्वप्न पहावे, उद्यांच्या, अपुल्या, मायभूमीचे ।।
स्वप्न पहावे, उद्यांच्या, अपुल्या, मायभूमीचे ।।३३।।

रंगरंगील, धुंद मधुर, चिर सौख्याचा ।
निरखिला आलेख, तयांच्या उत्तुंग प्रगतीचा ।।
प्रभाव हा, देश-प्रेम, शब्द नि वेळ जपण्याचा ।
अभाव, देशीं अपुल्या, या त्रिवेणी-संगमाचा ।।
अभाव, देशीं अपुल्या, या त्रिवेणी-संगमाचा ।।३४।।

शैलेशाच्या “त्या” आदेशांवर सदैव असणे ।
अर्थ याचाच, जीवनीं आम्हा, काही नसणे उणे ।।
झाले जीवन अवघे, अतीव लोभसवाणे ।
“केसरी” च आहे जगीं, खरोखरी चलनी नाणे ।।
“केसरी” च आहे जगीं, खरोखरी चलनी नाणे ।।३५।।

— गुरुदास – सुरेश नाईक

Avatar
About सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास 43 Articles
श्री. सुरेश नाईक हे एक उत्तम कवी आणि प्रवासवर्णनकार आहेत. त्यांनी अनेक प्रवासवर्णने पद्यस्वरुपात लिहिली आहेत. ते “गुरुदास” या टोपणनावानेही लेखन करतात. भारतीय नौकानयन महामंडळातून निवृत्त अधिकारी. मराठी / हिंदी / इंग्रजी भाषांचा व्यासंग. काव्य गायनाचे/काव्य वाचनाचे शेकडो कार्यक्रम केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..