नवीन लेखन...

वॉकी टॉकी

तेलवाहू जहाजावर कार्गो टँक्स मधून बाहेर पडणारे बेन्झीन किंवा हायड्रोजन सल्फाइड यासारखे विषारी वायूमुळे डेकवर सहसा कोणीही व्यायाम म्हणून चालण्यासाठी किंवा जॉगिंग साठी सहसा कोणी जात नाही. अडीचशे मिटर लांब जहाजाला एक फेरा मारला की अर्धा किलोमीटर सहजपणे चालणे होऊन जाते. आमच्या जहाजावर भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेला पन्नाशीचा एक सेकंड इंजिनियर होता. त्याला रोज संध्यकाळी पाच ते सहा असे एक तासभर चालण्याची सवय होती. जहाजावर आठ दिवसांपूर्वी कंपनीतील जुना मोटरमन जॉईन झाला होता ज्याने काही वर्षा पूर्वी याच जहाजावर दहा महिने काम केले होते. त्या मोटरमनचे नाव हसन होते पंचावन्न च्या पुढे वय असले तरी मोटरमनला आम्ही सगळे अधिकारी हसन भाई म्हणूनच हाक मारायचो.

सेकंड इंजिनियरला रोज रोज डेकवर तास तासभर चालताना बघून आठवडा झाल्यावर हसन भाई एक दिवस बोलला तीन साब ये हमारा सेकंड इंजिनियर एक दिन पागल हो जायेगा देख लेना. त्याला विचारले का काय झाले?? त्याने विचारले, आपको मालूम नही है क्या? त्याला विचारले कशाबद्दल ?? तुम्हाला 3P म्हणजेच पोर्ट साईड च्या 3 नंबर कार्गो टॅन्क जवळ गेल्यावर कधी आवाज नाही का आले?? कसले आवाज आणि 3P टॅन्क जवळच का आणि सेकंड इंजिनियरला वेड कशामुळे लागेल. उलट हसन भाईला बोललो आपल्या सेकंड साब ला तर ऐकायला पण खूप कमी येत कधी कधी तर त्याला काही सांगायचे किंवा विचारायचे असेल तर लिहून दाखवलं तर लवकर समजत हे मागील आठ दिवसात बघितले नाही का. हसन भाई मग सांगू लागला, तीन साब ये कहानी आज से तीन साल पुरानी है.

माझ्या सोबत एक एबल सीमन (एबी ), पंपमॅन (पंपी ) आणि एक कॅडेट असे चौघे जण आम्ही या जहाजावर सिंगापूर मध्ये जॉईन झालो होतो. दोन दिवसांनी जहाज सिंगापूरहुन निघाले आणि कंपनीने टॅन्क क्लिनिंग करायला सांगितले. जहाज पुढल्या पोर्ट मध्ये पाच दिवसात पोचणार होते. सिंगापूरला येण्यापूर्वी जहाजावर क्रूड ऑईल होते आता पुढील पोर्ट मध्ये डिझेल लोड करायचे असल्याने कंपनीने पाच दिवसातच सगळे कार्गो टॅन्क साफ करायला सांगितले. काम जास्त आणि वेळ कमी त्यामुळे सगळे डेक ऑफिसर्स आणि इंजिनियर्स सह खलाशांची चांगलीच तारांबळ उडणार होती.

पहिल्या दिवशी चीफ ऑफिसरने 3P टॅन्क जवळ सगळी तयारी करायला सांगितली दुपारी दोन च्या सुमारास एबी आणि पंपी 3P टॅन्क चे झाकण उघडून तिथे काहीतरी काम करत असताना एबीच्या खिशात असलेला वॉकी टॉकी खाली टॅन्क मध्ये पडला. एबी ला वाटले आता चीफ ऑफिसर आणि कॅप्टन च्या शिव्या खायला लागतील. तो पंपीला म्हणाला कोणाला सांगू नकोस मी खाली जाऊन वॉकी टॉकी घेऊन येतो. पंपी त्याला म्हणाला वेड बीड लागलंय का तुला पन्नास फुटांवरून खाली पडलेला वॉकी टॉकी एकतर फुटला असेल नाहीतर खाली क्रूड ऑईल मध्ये खराब झाला असेल. त्याहीपेक्षा अजून टॅन्क क्लिनिंग व्हायचे बाकी आहे, खाली जाणाऱ्या शिडीवर ऑईल असेल उतरताना किंवा चढताना खाली पडशील. तू काही खाली जाऊ नको आपण सांगू कॅप्टनला. पण एबी काही ऐकेना तो खाली भराभर उतरू लागला आणि खाली टॅन्क मध्ये उतरल्यावर शोधता शोधता खाली पडला. पंपी काय ओळखायचे ते ओळखला आणि त्याने लगेच वॉकी टॉकी वरून कार्गो कंट्रोल रूम मध्ये ड्युटी ऑफिसरला एबी खाली टॅन्क मध्ये उतरला आणि बेशुद्ध पडला असल्याचे कळवले.

जहाजावर इमर्जन्सी अलार्म वाजवण्यात आला सगळे जण दोन मिनिटात मस्टर स्टेशन वर जमा झाले. सेकंड ऑफिसर आणि दुसऱ्या एका एबीने कॉम्प्रेस एयर सिलिंडर असलेला ब्रिथिंग अप्रटसचे मास्क तोंडाला लावून टॅन्क मध्ये प्रवेश केला. खालून बेशुद्ध पडलेल्या एबीला दोर बांधून वर खेचण्यात आले. खाली गेलेले सेकंड ऑफिसर आणि दुसरा एबी वर यायला लागले.

पन्नास फूट खोल असलेल्या टॅन्क मध्ये वर येण्यासाठी तीव्र उताराची शिडी तीन टप्प्यात होती. वर येताना शेवटच्या टप्प्यावर सेकंड ऑफिसर चक्कर येऊन खाली बसला. पण दुसरा एबी दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात असताना त्याला पण चक्कर आली शिडीला असलेल्या ऑईल मुळे आधीच निसरड्या असलेल्या शिडीवरून त्याच्या हाताची पकड सैल झाली. वरून कॅप्टन आणि चीफ ऑफिसर बघत होते. पहिल्या एबीचे रेस्क्यू ऑपेरेशन साठी वाचवायला गेलेला दुसरा एबी त्यांच्या डोळ्यादेखत चाळीस फुटांवरून म्हणजेच जवळपास चौथ्या मजल्यावरून खालच्या एका टप्प्यावर धाडकन आदळून खाली टॅन्क च्या लोखंडी तळावर पडून काही मिनिटात तडफड करत होता. सेकंड ऑफिसरला वरच्या टप्प्यावरून पंपी ने ब्रिथिंग अप्रटस चा एअर मास्क चढवला आणि खाली उतरून त्याला वर चढवण्यासाठी दोर बांधला. खाली पडलेला पहिला एबी आणि सेकंड ऑफिसरला मास्क लावून ऑक्सिजन दिल्यावर काही मिनिटात ते शुद्धीवर आले. पण वरून खाली पडलेला दुसरा एबी उंचावरून पडल्याने हाता पाया सह शरीरातील बहुतेक हाडे मोडल्याने गंभीर जखमी होऊन मरण पावला. टॅन्क मध्ये क्रूड ऑईल पासून निघालेल्या विषारी गॅसेस मुळे गुदमरल्याने त्याची तडफड काही मिनिटे कॅप्टन आणि चीफ ऑफिसर वरून हताशपणे बघत होते. शंभर ते सव्वाशे डॉलर्स च्या वॉकी टॉकी साठी दोघांचे जीव जाता जाता परत आले पण जो वाचवायला गेला होता त्याचाच जीव गेल्याने संपूर्ण जहाजावर एक विचित्र अस्वस्थता पसरली.

पंपमॅन ने सहकाऱ्याला धोकादायक परिस्थिती आणि वातावरणात जाण्यापासून रोखता आले नाही म्हणून , एबीला त्याला दिलेले उपकरण व्यवस्थित हाताळता आले नाही म्हणून आणि चीफ ऑफिसरला सुरवाती पासून संपूर्ण टॅन्क क्लिनिंग ऑपेरेशनचे नियोजन करता आले नाही म्हणून कंपनीने घरी परत पाठवले. जहाजावर विशेषतः ऑईल टँकर किंवा इंधनाच्या टाक्या साफ करताना विशेष काळजी घेतली जाते. या टाक्यांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण तर कमी असतेच परंतु गंध नसलेले अनेक विषारी वायू देखील असतात ज्यांची तपासणी किंवा प्रमाण करण्यासाठी उपकरणे असतात. प्रत्येक टाकीतील गॅसेस बाहेर काढून त्यात फ्रेश एअर किंवा ताजी हवा भरण्याची एक प्रोसिजर आणि सिक्वेन्स असतो तसेच इमर्जन्सी मध्ये कसे काम करायचे याची पण एक पद्धत असते. लहान लहान चुका जीवावर बेततात. एखाद्याची चुकी नसताना सुद्धा त्याला त्याचा जीव गमवावा लागतो.

हसन भाई पुढे सांगू लागला पुढे तो जहाजावर असे पर्यंत 3P टॅन्क जवळ कोणी शक्यतो जात नसे कारण आतमध्ये कोणीतरी असहायपणे विव्हळत असल्याचा आवाज येत असल्याचा भास होत असे.

© प्रथम रामदास म्हात्रे

मरीन इंजिनियर

B. E. (Mech), DIM.

कोन, भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..