बकुळ प्रांगणात गंधाळलेला
अंतरात , दरवळतो अजूनही
अधीरता ती फुले वेचण्याची
भाव निष्पाप स्मरतो अजूनही ।।१।।
मन नाजूक ती फुलेही नाजूक
स्पर्श ! मनभावनांचा आगळा
रंग , रूपही ते सात्विक सुंदर
दवभरलेले क्षण नेत्री अजूनही ।।२।।
आनंद हाच जगवितो जीवाला
साक्ष आठवांची गंधाळ कस्तुरी
मुक स्पर्श , संवेदनांचाच रेशमी
गुणगुण प्रीतभावनांची अजूनही ।।३।।
लोभस सांध्यपर्व रंगले केशरी
जणू तुझ्याच रूपाची उधळण
सजविते , साऱ्याच नभांगणाला
सत्य ! निरागस हृदयी अजूनही ।।४।।
– वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ९०.
३ – ७ – २०२१.
Leave a Reply