नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा वाढदिवस.

मराठी नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये विविध भूमिका करून आपल्या अभिनयाचा स्वतंत्र ठसा उमटविलेले ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांचा जन्म. १२ जुलै १९५३ रोजी बंगलोर येथे झाला.

मोहन जोशी यांचा जन्म जरी बंगलोरचा तरी बालपण व शिक्षण पुण्यात झाले. मोहन जोशींना लहानपणापासूनच नाटकात काम करण्याची आवड होती. त्यामुळे वडिलांनीही नाटकात काम करण्याची परवानगी दिली. नाटकात काम करण्याचा प्रारंभ त्यांनी १९६६ म्हणजे इयत्ता सहावीत असल्यापासून केला. पहिले नाटक ’टुणटुण नगरी खणखण राजा’ हे होते. त्यांनी शालेय जीवनात गाणारा मुलुख आणि थीफ पोलीस हा एकांकिकांत काम केले होते.

बी.एम.सी.सी. मध्ये शिकत असताना ते नाटकात काम करत असत. कॉलेजात असताना मोहन जोशी यांनी काका किशाचा, तीन चोक तेरा, डिअर पिनाक आणि पेटली आहे मशाल या नाटकांत कामे केली होती.

पदवीधर झाल्यावर पोटापाण्याची सोय व्हावी म्हणून किर्लोस्कर कंपनीत नोकरीला लागले. पण नाटकाच्या दौर्‍यांसाठी सुट्ट्या लागायच्या आणि त्यासाठी प्रत्येक वेळी खोटे बोलणे अपरिहार्य झाले. एक दिवस व्यवस्थापकाजवळ त्यांचे बिंग फुटले आणि त्यांनी नोकरी किंवा नाटक यापैकी एक निवडायला सांगितले. मोहन जोशी यांनी शांतपणे विचार करून दुसर्‍याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. नाटकाने पोट भरेल अशी स्थिती नव्हती त्यामुळे स्वत:चा ट्रक घेऊन मोहन जोशी ड्रायव्हर झाले. आठ वर्षे ड्रायव्हर म्हणून काम केले.

पुढे ‘एक डाव भुताचा’ या पहिल्या मराठी चित्रपटात त्यांना खलनायकाची भूमिका मिळाली, आणि शेवटी ते अभिनयक्षेत्रात स्थिरावले. ’कुर्यात्‌ सदा टिंगलम्‌’ हे मोहन जोशी यांचे व्यावसायिक रंगभूमीवरचे पहिले नाटक. मोहन जोशी यांनी मराठी, हिंदीसह भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आजपर्यंत २५० चित्रपटात काम केले आहे. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे.

मोहन जोशी यांना नाटक अकादमी पुरस्कार ही मिळाला आहे. मोहन जोशी आणि पत्नीश ज्योती जोशी यांनी ’गौरीनंदन थिएटर्स’ नावाची एक नाट्यसंस्था स्थापन केली. या संस्थेतर्फे गजरा (चित्रवाणी मालिका), डिटेक्टिव्ह जयराम(मालिका), भटाच्या चालीने (नाटक), मनोमनी (नाटक) अशी उत्तम मराठी नाटके आणि दूरचित्रवाणी मालिका निर्माण केली. ते मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते.

– संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..