नवीन लेखन...

ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ

ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ यांचा जन्म १९४५ मध्ये झाला.

असे म्हणतात देवयानी चौबळ या अत्यंत फटकळ सिनेपत्रकार होत्या. तिच्या जिभेच्या तडाख्यात भलेभले सापडले होते. त्या बॉलीवूड मध्ये देवी या नावाने प्रसिद्ध होत्या. खरे तर त्यांना फिल्मस्टार व्हायचं होतं. घरात सगळे पोलीसखात्यात नोकरीला. त्यांचे वडील सुप्रसिध्द वकील होते. त्यांना हिरोईन म्हणून सगळीकडे मिरवायचं होतं. दिसायलाही त्या देखणी होती. छोट्या मोठ्या सिनेमात सहज काम मिळाले असते.

देवयानी या शाळा संपण्यापूर्वीच दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्याशी लग्न करायचं होतं. पण दुर्दैव दिलीप कुमारने देवयानी यांना नकार दिला. त्या मुळे देवयानी बिथरल्या. आधीच ती फटाकडी होती त्यात डोक्यात राग. सिनेमामध्ये करीयर सुद्धा झालं नाही. मग लिखाणाकडे वळल्या. अंगात भिनलेला सगळा जहर ती आपल्या लेखातून बाहेर काढू लागली. इंग्लिश वर तिची कमांड होतीच पण गरज पडेल तिथे हिंदी शब्द वापरून हिंग्लिश लिखाणाची पहिली सुरवात तिने भारतात केली. दिलीपकुमार यांच्या विरुद्ध लिहिण्यासाठी त्यांनी ज्युनियर रिपोर्टर म्हणून ‘स्क्रीन’ जॉइन केले, पण त्यांच्या वागणुकीने तीन दिवसांत नोकरीच्या बाहेर करण्यात आले आणि त्यांना नोकरी गमवावी लागली. पण, त्यांनी हार मानली नाही. त्या काळी ‘स्टार अँड स्टाईल’ नावाचे एक नवीन मासिक आले होते आणि त्यात महिला पत्रकारांची गरज होती तेथे देवयानी यांना नोकरी मिळाली आणि लवकरच त्या ‘फ्रँकली स्पिकिंग’ या नावाचा स्वतःचा स्तंभ देवी या नावाने लिहू लागल्या.

नावाप्रमाणेच बिनधास्त खुसखुशीत लेख, त्यातल्या तिखट जाळ गॉसिप गप्पा थोड्याच दिवसात पॉप्युलर झाल्या. लोक आवडीने या लेखांची वाट पाहू लागले आणि बॉलीवूड? बॉलीवूड तिच्या नावाने खडे फोडू लागले. यात सगळ्यात आघाडीवर होता सुपरस्टार दिलीप कुमार ज्यांनी देवयानी यांना नाही म्हणायची हिंमत केली होती. देवयानी आपल्या प्रत्येक लेखात त्याला उभा आडवा सोलायच्या. तो म्हातारा होत चाललाय, त्याची जादू संपलीय याच्या चर्चा करायची. त्याने मुलगा व्हावा म्हणून आस्मा नावाच्या बाईशी दुसरा निकाह केला ही बातमी सुद्धा तिने फोडली. दिलीप कुमार वैतागले. त्यांनी आपल्या फिल्मइंडस्ट्रीमधल्या सगळ्या दोस्तांना बजावलं की देवयानीला मुलाखत द्यायची नाही. पण ही अघोषित बंदी खूप काळ चालू शकली नाही. किती जरी नाव ठेवली तरी फिल्म इंडस्ट्रीला देवयानी चौबळ सारख्या पत्रकाराची गरज होतीच. देवयानी एकीकडे आणि बाकीचे फिल्म मगझीन एकीकडे. सगळ्यांच्यात ठसठसीत उठून दिसणाऱ्या देवयानीशी आपले संबंध चांगले राहावेत यासाठी सगळे फिल्मस्टार प्रयत्न करायचे.

आज जी फिल्मी पत्रकारिता प्रचलित आहे याचा देवयानी चौबळ यांनी शुभारंभ केला होता. आजकाल हे फंडे सिनेमा चे प्रमोशन करण्यासाठी सर्रास वापरले जातात, पण त्याकाळी लोकासाठी हे सर्व नवीन होते.

आराधना या सिनेमावेळी देवयानीची आणि राजेश खन्नाची ओळख झाली. या भेटीत त्याने काय जादू केली माहीत नाही पण देवयानी अगदी त्याच्या प्रेमात पडली. तसं पाहायला गेलं तर अख्ख्या देशातल्या पोरी तेव्हा राजेश खन्नाच्या प्रेमात होत्या, पण यात देवयानीचा मोठा हात होता.

इतरानां कायम शिव्या घालणारी फटाकडी देवयानी राजेश खन्नाबद्दल बोलताना मात्र नुसता कौतुक, विशेषणांचा भडीमार करायच्या. त्याला सुपरस्टार ही उपाधी पहिल्यांदा देवयानी यांनीच दिली. तिच्या लेखात येणाऱ्या सुपरस्टार, सुपरस्टार या उल्लेखामुळे सगळे राजेश खन्नाला सुपरस्टार म्हणू लागले. देवयानी अगदी बिनधास्त होती. राजेश खन्नाबरोबरची मैत्री, त्याच्यावरच प्रेम कधी लपवायची नाही. आपण आयुष्यात एकाच पुरुषाबरोबर रात्र घालवली आहे तो म्हणजे राजेश खन्ना असं रोखठोक सांगायची. राजेशने मात्र अंजू महेंद्रू बरोबर देवयानी चौबळला सुद्धा गंडा घालून लग्न केलं तरुण डिम्पल कपाडिया बरोबर आणि ही बातमी पहिल्यांदा सांगितली देवयानीलाच.

पण राजेश खन्नावर चिडणे त्यांना शक्य नव्हते. तो त्यांच्यासाठी देव होता. राजेशने देखील तिच्यावरचा आपला कृपाशीर्वाद कधी काढून घेतला नाही. असं म्हणतात की देवयानी चौबळ ने आनंद चित्रपट बघितल्यावर त्याला सांगितलेलं की या सिनेमात त्याच्याबरोबर काम केलेला अमिताभ बच्चन पुढे जाऊन त्याची खुर्ची काढून घेऊ शकतो.

त्यांनी त्या काळी अमिताभ यांच्याबद्दल एक भविष्य वर्तवले होते. ‘अमिताभ बच्चन हा असा नट आहे की तो प्रसिद्धीच्या शिखरावर जाईल. पण तो इतरांसारखा तिथून खाली कोसळणार नाही; तर एक एक पायरी उतरत आपली स्वतःची अशी वेगळी जागा बनवेल…’ आजवरचा या महानायकाचा प्रवास पाहता ते खरंच झालेलं दिसतं आहे!
देवयानी चौबळ यांचा हिंदी चित्रपटसृष्टीत गॉसिप कॉलमला कमालीचं ग्लॅमर मिळवून देण्यात यांचा खूप मोठा हातभार होता. त्यांच्या लेखणीबरोबरच त्यांची बिनधास्त अ‍ॅटिट्यूड, बोलणं, दिसणं या सर्वच गोष्टी चर्चेचा विषय असायच्या.

देवयानी चौबळ यांनी पत्रकारितेचे धडे आचार्य अत्रे यांच्या कडे गिरवले होते. शिरिष पै व देवयानी यांची खास मैत्री होती. एका दिपावली अंकात ताईनी “देवी” नावाचा तिच्या जीवनावर व आठवणी वर एक लेख लिहिला होता. एवढी वर्षे झाली तरी राजेश खन्ना विषयीच तीच एकतर्फी प्रेम कमी झालं नाही. त्याच्या साठी तिने डायट सुरु केलं होतं. पण याचा परिणाम तिच्या तब्येतीवर झाला आणि त्यात पॅरालीसीसच्या अटॅकमुळे ती अगदीच गारद झाली. त्यातूनही तिने आपले फटाकेदार लिखाण चालूच ठेवले होते. या काळात धर्मेंद्र आणि सुनील दत्त यांनी तीला मदत केली.
असं म्हणतात की शेवटपर्यंत ती राजेश खन्नाच्या प्रेमातचं जगली. येणाऱ्या जाणाऱ्याना सांगायच्या, की राजेश मला रोज फुलं पाठवतो. त्याच्यासाठी मी बरी होणार.

देवयानी चौबळ यांचे १३ जुलै १९९५ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

2 Comments on ज्येष्ठ सिनेपत्रकार देवयानी चौबळ

  1. Sir
    Excellent
    tumhi mala majhya College jivnat gheun gele
    aata ek ek ghost reti sarkhi hata tun Surat aahet…….
    Zindgike Safar main gujar jate hai wo makam phir nahi aate

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..