नवीन लेखन...

क्रिकेटपटू सर लेन हटन

सर लियोनार्ड हटन यांचा जन्म २३ जून १९१६ रोजी यॉर्कशायर लंडन येथे झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये अनेक जण स्थानिक क्रिकेट खेळत असत कारण त्या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या खेळात रुची होती. लेन हटन तेथील लिटीलमूर कौन्सिल शाळेच्या मैदानामध्ये खेळत असत. लेन हटन हे १९२१ ते १९३० पर्यंत त्या शाळेमध्ये होते. वयाच्या १२ व्या वर्षी ते पुडसें सेंट लॉरेन्स क्रिकेट क्लबमध्ये जाऊ लागले. १९२९ पर्यंत त्यांच्या त्या क्लबच्या फर्स्ट टीमपर्यंत पोहोचले. तिथल्या लोकांनी त्यांना यॉर्कशायर आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू हर्बर्ट सूटक्लिफ यांना भेटण्यास जावे म्हणून आग्रह धरला. हर्बर्ट सूटक्लिफ यांच्याशी भेट झाल्यावर सूटक्लिफ हटन यांची प्रगती पाहून प्रभावित झाले आणि त्यांनी हटन यांना यॉर्कशायर कडून पुढील भविष्यासाठी खेळ म्हणून सांगितले. त्यानंतर हटन हे हेडिंग्ले येथे इनडोअर सरावासाठी जाऊ लागले. तेथे जॉर्ज हिर्स्ट हे तेथे तरुण क्रिकेटपटूंना कोचिंग करत होते . त्यामुळे आपण क्रिकेटमध्येच करिअर करायचे , व्यावसायीक क्रिकेट खेळण्याचे ठरवले. साधारणतः १९३० च्या सुमारास हटन यांनी ऑस्ट्रेलियाचा सर डॉन ब्रॅडमन यांना खेळताना पाहिले तेव्हा सर डॉन ब्रॅडमन यांनी हेडिंग्ले कसोटी सामन्यामध्ये ३३४ धावा केल्या होत्या. हा त्यांचा कसोटी सामन्यामधील सार्वधिक धावांचा रेकॉर्ड होता. तोच रेकॉर्ड लेन हटन यांनी ७ ते ८ वर्षानंतर मोडला आणि ३६४ धावा केल्या होत्या. सुदैवाने चित्रफितीमध्ये तो प्रसंग बघता येतो हे महत्वाचे. लेन हटन यांनी त्यांचे शिक्षण चालू ठेवले होते त्यांनी टेक्निकल आणि वडिलांच्या बिल्डरच्या व्यवसायाला उपयुक्त शिक्षण घेतले . हटन यांचे क्रिकेट खेळणे चालूच होते तसेच विंटर सीझनमध्ये ते १९३९ पर्यंत कामही करत होते.

१९३३ पासून हटन पुंडसे टीमसाठी सलामीला येऊन खेळत असत . त्यांचा त्यांच्याबरोबर जो सलामीला खेळायला साथीदार यॉर्कशायरचा फलंदाज एडगर ओल्ड्रॉयड यांची फलंदाजी , तंत्रशुद्धपणा हटन नेहमी अत्यंत लक्ष देऊन बघत होते आणि स्वतःच्या फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होते. तेथील वृत्तपत्रांनादेखील हटन यांनी पुंडसेसाठी केलेल्या नाबाद १०८ धावा हटन यांची प्रॉमिसिंग खेळाडू आहेत ह्याची खात्री पटवून गेली. यॉर्कशायरकडून खेळताना १९३३ च्या सीझनमध्ये त्यांनी ६९.९० च्या सरासरीने ६९९ धावा केल्या. यॉर्कशायरने सिरिल टर्मर यांना हटन यांचा म्हणून नियुक्ती केली. त्यांनी पुढील सीझनमध्ये ३३.१९ च्या सरासरीने ८६३ धावा केल्या.

लेन हटन पहिला फर्स्ट क्लास सामना वयाच्या १७ व्या वर्षी १९३४ साली खेळले. १९३५ सालच्या सिझन आधी हटन यांच्या नाकाचे ऑपेरेशन झाल्यामध्ये त्यांना तो सिझन उशीरा सुरु करावा लागला. त्यामध्ये त्यांचे आजारपण उदभवले ऑगस्ट पर्यंत त्यांनी फक्त ७३ धावा केल्या. तरीपण फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी २८.८१ च्या सरासरीने ५७७ धावा केल्या. १९३६ च्या सीझनमध्ये मध्ये त्यांनी १००० धावा पहिल्यांदा पुऱ्या केल्या , त्यांनी त्या सीझनमध्ये २९.८१ च्या सरासरीने १,२८२ धावा केल्या.

लेन हटन यांनी पहिला कसोटी सामना २६ जून १९३७ रोजी न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्सवर खेळला परंतु त्या आधी त्यांनी डर्बीशायर विरुद्ध २७१ आणि लॅन्केशायर विरुद्ध १५३ धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ० आणि १ अशा धावा केल्या. परंतु दुसऱ्या कसोटीमध्ये मात्र यांनी ओल्ड ट्रॅफर्डला शतक केले. १९५३ च्या सीझनमध्ये त्यांची तब्येत बिघडल्यामडुळे ते जास्त काही करू शकले नाहीत. त्यांना फायब्रॉसिटीसचा आजार होता. त्यामुळे त्यांच्या हालचालीवर नियंत्रण येत होते. तरी पण त्या आजारावर मात करत त्यांनी अनेक मोठे विक्रम केले. ते टीमचे कप्तान होते. त्यांनी सर डॉन ब्रॅडमन यांचा ३३४ धावांचा रेकॉर्ड मोडला परंतु त्यांनी विली हेंमंड यांचाही ३३६ धावांचा रेकॉर्ड मोडून ३६४ धावा केल्या. त्यामुळे ते इतके ‘ लाईमलाईट ‘ मध्ये आले की दुपारच्या स्तरातील चहापानापर्यंत त्यांना ५०० मेसेजेस आले. हा वेगळाच रेकॉर्ड त्यांच्या नावावर झाला. एकदा तर एक पोलिसाने त्यांना त्यांची गाडी चुकीच्या जागी पार्क केले होती मम्हणून पकडले होते परंतु त्या पोलिसाने त्यांच्याकडे ऑटोग्राफ मागितली आणि दंड न घेता सोडून दिले होते.

लेन हटन यांच्याबद्दल खूप काही सांगता येईल. परंतु आपण आत त्यांच्या क्रिकेटच्या आकड्यांकडे बघू या, सर लेन हटन यांनी ७९ कसोटी सामन्यामध्ये ५६.६७ च्या सरासरीने ६९७१ धावा केल्या त्यामध्ये त्यांची १९ शतके आणि ३३ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती ती ३६४ धावा तर त्यांनी ३ विकेट्सही घेतल्या. ५१३ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी ४०,१४० धावा ५५.५१ या सरासरीने काढल्या. त्यामध्ये त्यांची १२९ शतके आणि १७९ अर्धशतके होती. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती ३६४. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७३ विकेट्सही घेतल्या. त्यामध्ये एका इनिंगमध्ये त्यांनी ७६ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. खरे तर त्यांची दुसऱ्या महायुद्धामुळे ७ ते ८ वर्षे वाया गेली होती नाहीतर त्यांनी आणखी विक्रम केले असते. लेन हटन यांनी १३८ कसोटी सामन्यांमध्ये फक्त ३ षटकार मारले आहेत. हे अत्यंत वेगळे आहे कारण नीट पाहिले तर त्यांचे ग्राऊंडस्ट्रोक्स इतके जबरदस्त आणि साहसी , तसेच तंत्रशुद्ध होते.

निवृत्तीनंतर ते क्रिकेटशी जोडले गेले होते परंतु ते लिव्हरपूलचे आधी शेफर्ड झाले आणि त्यानंतर लिव्हरपूलचे बिशपही झाले. ते पुढे पत्रकार झाले , त्यांनी लेखनही केले. त्यांना ‘ सर ‘ हा किताब देऊन इंग्लंडने त्यांचा सन्मान केला. त्याचप्रमाणे ते इंग्लंडच्या कसोटीचे क्रिकेटचे दोनदा सिलेक्टर झाले.

सर लेन हटन यांचे ६ सप्टेंबर १९९० रोजी निधन झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..