भजन आणि गझल गायक अनुप जलोटा यांचा जन्म २९ जुलै १९५३ नैनीताल येथे झाला.
अनुप जलोटा यांचे वडिल पुरूषोत्तम जलोटा पंजाबच्या प्रख्यात शाम चौरासी घराण्याशी संबंधीत होते. जलोटा यांनी वयाच्या सातव्या व्या वर्षी गायनाला सुरूवात केली. अनुप जलोटा यांच शिक्षण लखनऊच्या भातखंडे म्युझिक इंस्टीट्यूटमध्ये झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनुप जलोटा यांनी मुंबईमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तिथे त्यांनी भरपूर संघर्ष केला. अनुप जलोटा यांनी आकाशवाणी वर कोरस गायक म्हणून करियरला सुरवात केली. मुंबईत आल्यावर त्यांची गाणी हिट झाली आणि त्यांना म्युझिक कंपन्यांकडून गाण्यांची ऑफर मिळाली. त्यावेळी एखादीच अशी म्युझिक कंपनी असले ज्यासोबत त्यांनी काम केलं नाही. ‘ऐसी लागी लगन’, ‘मैं नहीं माखन खायो’, ‘रंग दे चुनरिया’, ‘जग में सुंदर दो नाम’ आणि ‘चदरिया झीनी रे झीनी’ सारखी भजनं अतिशय लोकप्रिय झाली. भजनांना मंदिराच्या दारापासून मंचापर्यंत आणण्याचं काम अनुप जलोटा यांनी केलं. ते अनेक वाद्ये वाजवतात. तबला वादक झाकिर हुसैन आणि संगीतकार गुलाम अली यांच्यासोबत परदेशात देखील अनुप जलोटा यांनी कार्यक्रम केले.
अनुप जलोटा यांनी पहिलं लग्न आपली गुजराती शिष्या सोनाली शेठसोबत केलं. या जोडीने गायन क्षेत्रात ‘अनूप – सोलानी’ नावाने खूप नाव कमावलं. अनुप जलोटा यांचा दुसरा विवाह कुटुंबियांच्या सहमतीने बीना भाटीयाशी केलं. मात्र त्यांच लवकरच घटस्फोट झाला. तिसरं लग्न अनुप जलोटा यांनी १९९४ साली मेधा गुजराल सोबत केले. मेधा माजी पंतप्रधान आय के गुजराल यांची भाची आणि दिग्दर्शक शेखर कपूरची पहिली पत्नी होती. मेधा गुजराल यांचे २५ नोव्हेंबर २०१४ मध्ये न्यूयॉर्कमध्ये हार्ट अटॅक आणि किडनी ट्रान्सप्लान्ट दरम्यान निधन झालं. अनुप जलोटा-मेधा गुजराल यांना एक मुलगा आहे. त्याने नाव आर्यमन आहे. दोन वर्षापूर्वी ते बिग बॉस मध्ये दिसले होते.
अनुप जलोटा यांनी सितारा ग्रुप नावाची फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केली. याच्या अंतर्गत त्यांनी हिंदी आणि भोजपुरी सिनेमे तयार केले. यामध्ये बनी चौधरी त्यांची पार्टनर होती. भारत सरकारने अनूप जलोटा यांना २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. अनुप जलोटा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
अनुप जलोटा यांनी गायलेली काही भजने
https://www.youtube.com/watch?v=R9s2n3a3V9M
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply