भानू अथय्या म्हणजेच भानुमती अण्णासाहेब राजोपाध्याय यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांच्या वडलांचे नाव अण्णासाहेब आणि आईचे नाव शांताबाई होते. भानू जेव्हा नऊ वर्षाची असताना अण्णासाहेब यांचे निधन झाले. ते पेंटर होते. भानू अथय्यांचे कलेचे शिक्षण लहानपणापासून चालू होते. चित्रकलेचे शिक्षक त्यांना घरी येऊन शिकवयाचे. आपले शाळेतले शिक्षण संपवून त्या मुबंईला जे.जे. स्कूल आर्टस् मध्ये आल्या. त्याना फाईन आर्ट्समध्ये डिग्री मिळाली. उत्तम गुणांनी त्या पास झाल्या, त्यांना त्यावेळी गोल्ड मेडल मिळाले. आणि फेलोशिपही मिळाली. पुढे फ्रान्सिस सुझा यांच्या ‘ प्रोग्रेसिव्ह आर्टस् ग्रुप ‘ मध्ये त्या सदस्य झाल्या.
त्यांनी पुढे वेगवेगळ्या महिलांच्या इंग्रजी मासिकांसाठी रेखाटने केली. त्यानंतर त्यांनी ड्रेस डिझायनींगला सुरवात केली. ह्या ड्रेस डिझायनींगच्या यशामुळे त्यांना हा आपल्या करिअरसाठी वेगळा मार्ग सापडला. त्यांनी हा व्यवसाय करता करता गुरुदत्तच्या चित्रपटांसाठी ड्रेस डिझायनींग करायला सुरवात केली. गुरुदत्तच्या १९५६ साली आलेल्या सी. आय. डी. पासून त्यांच्या ड्रेस डिझयानींगला सुरवात झाली आणि त्या गुरुदत्तच्या टीमचा एक भागच बनल्या.
भानू अथय्या यांचे लग्न सत्येन्द्र अथय्या यांच्याशी झाले. ते कवी होते आणि त्यांनी काही हिंदी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. सत्येंद्र अथय्या यांनी इबन-ए-बटूटा, आकाश, ह्या चित्रपटांसाठी गाणी लिहिली असून ती गाणी मीना कपूर,तलत मेहमूद, लता मंगेशकर यांनी गायली आहेत. परंतु पुढे त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर भानू अथय्या यांनी परत लग्न केले नाही. त्यांना एक मुलगी असून ती कोलकाता येथे रहाते.
भानू अथय्या यांना १९८३ साली ऑस्कर अवॉर्ड मिळाले ते ‘ गांधी ‘ या चित्रपटासाठी. ऑस्कर अवॉर्ड मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत. गांधी चित्रपटासाठी सर्व ड्रेस बनवणे खूप मोठे आव्हान होते. ते त्यांनी समर्थपणे पेलले. १९९१ साली त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले. २००९ साली त्यांना फिल्मफेअर लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले. त्याचप्रमाणे लाडली लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाले.लगानं चित्रपटासाठी देखील त्यांनी ड्रेस डिझायनींगचे काम केले होते तेसुद्धा मोठे आव्हानच होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चित्रपटासाठी त्यांनी जे कपडे डिझाईन केले ते देखील आव्हान होते. मला आठवतंय त्यांना पहिल्यादा पाहिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमासाठी मामुटीपासून सर्व कलाकार आले होते तेव्हा पाहिले.
प्रचंड अभ्यास आणि कष्ट या कामासाठी त्यांना घ्यायला लागले. आजही तुम्ही त्यांनी ज्या चित्रपटासाठी ड्रेस डिझाईन केले त्यांची नावे पहिली तर लक्षात येईलच. आपण संपूर्ण चित्रपट बघतो, कलाकार, तंत्रज्ञ यांचे कौतुक करतो परंतु ड्रेस डिझाईनरकडे फारसे लक्ष जात नाही. त्यांनी ज्या चित्रपटासाठी त्यांची सी. आय. डी., प्यासा, कागज के फूल, चौदवी का चाँद, साहेब, बीबी और गुलाम, गंगा जमुना, वक्त, गाईड, मेरा साया, आम्रपाली, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर, खिलौना, धुंद, हेरा फेरी, पुकार, गांधी, प्रेमरोग, रझीया सुलतान १९४२, ए लव्ह स्टोरी, जॉनी मेरा नाम, मेहबुबा, ध्यास पर्व, लगान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे सुमारे शंभर चित्रपटांचे ड्रेस डिझायनींग त्यांनी केले आहे. ह्या चित्रपटातील गाणी म्हणा किंवा वेगवेगळ्या स्टाईलचे कपडे आपल्याला निश्चित आठवतील.
भानू अथय्या यांना जेव्हा ऑस्कर अवॉर्ड समारंभात दिले गेले तेव्हा त्या आपल्या छोट्या भाषणात भावुक होऊन म्हणाल्या. ” थँक यू ऍकेडमी अँड थँक यू टू सर रिचर्ड अटेनबरो फॉर फोकसिंग वर्ल्ड अटेनशन ऑन इंडिया ”
आजही त्या भारतातील अनेक नामवंत ड्रेस डिझायनर आणि कलाकारांच्या ‘ आयकॉन ‘ आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply