आमच्या गावी टेकडीवर एक स्वयंभू शिवपिंड असलेलं मंदीर आहे. मला नेहमीच त्या मंदिराचं विशेष आकर्षण वाटतं! का? हे कोडे अजूनही उलगडत नाही. मला धार्मिक गोष्टीचे लहानपणापासून विशेष आकर्षण होते. माझ्या हाती कोणतेही धार्मिक पुस्तक अपघाताने हातात आल्यास ते मी एका झटक्यातच वाचून काढतो त्यात स्वामी विवेकानंद यांचे “कर्मयोग” हे विशेष पुस्तक आहे जे मला विशेष आवडायचे. रामायण महाभारत ते तर जवळ जवळ तोंडपाठ आहे. मला आश्चर्य वाटते की आजचे बरेच कीर्तनकार कित्येक पौराणिक कथांचे चुकीचे संदर्भ देतात. आणि लोकं टाळ्या वाजवतात त्याला कारण त्यांचे अज्ञान बहुसंख्य कीर्तकार वारंवार वांझोट्या बाईचा उल्लेख करताना दिसतात ते मला खूप खटकत. वांझोटी असणं हा काही गुन्हा नाही आणि जर तिच्या वांझोटीपणाला नवरा कारणीभूत असेल तर त्यावर भाष्य करीत नाहीत. मुलांचं सुख हे ही भौतिक सुख आहे. खरं अध्यात्म तेच आहे जे तुम्हाला सर्व भौतिक सुखांचा त्याग करायला शिकविते.
आता म्हणजे कोरोना संकट येण्यापूर्वीच मी ज्योतिष शास्त्राचा ऑनलाईन अभ्यास केला. खरं तर माझा हा अभ्यास फार पूर्वीच सुरू झाला होता पण मला दिशा सापडत नव्हती. डॉ.ज्योती जोशी यांच्याकडून मी ज्योतिष शास्त्राचे धडे घेतले. तीन परीक्षाही पास झालो . पण मला व्यक्तीशः ज्योतिषी होण्यात रस नव्हता पण आपल्याला अनेक गूढ शास्त्रांपैकी एक असणाऱ्या ज्योतिष शास्त्राचे जुजबी ज्ञान असावे ही अपेक्षा होती. आमच्या गुरू डॉ. ज्योती ज्योशी यांनी ज्योतिष शास्त्र शिकविण्याची सुरुवातच या वाक्याने केली होती की भविष्य कोणालाही बदलता येत नाही. मलाही असे वाटते की ज्योतिष शास्त्र हा भविष्य दाखविणारा फक्त एक आरसा आहे. ज्योतिष शास्त्राचा पसारा इतका मोठा आहे की तो अजूनही मनुष्याच्या आवाक्याबाहेरचा आहे म्हणूनच अजूनही मोठ्यात मोठ्या ज्योतिष्याला सर्वांचेच अचूक भविष्य कथन करणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्योतिष्यावर विश्वास ठेवणाऱ्यानी त्या शास्त्रावर डोळसपणे विश्वास ठेवायला हवा! कोणीतरी सांगतोय म्हणून त्यावर आंधळा विश्वास ठेवू नये. कोणालाच कोणाचे भविष्य बदलता येत नाही. स्वतः ईश्वरही तुमच्या भविष्यात ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे भविष्य बदलण्याचा प्रयत्न हा मूर्खपणा ठरतो. तुमचं भविष्य ही एक पूर्वनियोजित गोष्ट असते जसे की वैज्ञानिक भाषेत सांगायचे तर एका सिडीत जसा एखादा चित्रपट साठवलेला असतो. माझ्या आईवडिलांनी साधारणतः १२ वर्षांपूर्वी माझ्या लग्नासाठी माझी जन्मपत्रिका बनवून घेतली होती. ती पत्रिका हाताने तयार केलेली होती मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केल्यावर माझ्या लक्षात आले त्या पत्रिकेत एक अतिशय महत्वाचा ग्रह म्हणजे लग्नेशच चुकीच्या घरात मांडला होता. माझे लग्न जुळत नाही म्हणून अनेक भटजींनी ती पत्रिका पाहिली असेल पण एकही भटजीच्या मनात ती पत्रिका बरोबर आहे का हे तपासून पाहावे असे वाटले नाही.
तीन चार वर्षांपूर्वी आमच्या गावच्या भटजींने तीच चूक केली. साधारणतः माझ्या पत्रिकेतील तूळ ही रसिक रास पाहून माझ्या वडिलांना विचारले तुमच्या मुलाचे कोठे बाहेर लफडे आहे का? म्हणजे मी दिसायला बरा आहे इतका की कोणी माझ्या प्रेमात पडू शकते म्हणून असेल पण ते ठामपणे म्हणाले नाहीत की तुमचा मुलगा स्त्रीलंपट आहे. याचा अर्थ ते ठामपणे सांगावे इतकेही त्यांना ज्योतिष शास्त्राचे ज्ञान नव्हते. मग काय? ही शांती करा आणि ती शांती करा! जे ग्रह करोडो लोकांचं भविष्य ठरवितात ते कोणी एका तुच्छ माणसाने शांती केली म्हणून आपल्या कार्यात बदल करणार आहेत का? तर नाही. माझे लग्न होत नाही असे माझ्या जवळच्या व्यक्तींना वाटते पण वास्तव हे आहे की मलाच लग्न करायचे नाही आणि केले तर ते कोणत्या परिस्थितीत करायचे हे माझे अगोदरच ठरले होते. मी ब्रम्हदेव जरी वरून खाली आले आणि त्यांनी जरी मला माझे विचार बदलायला सांगितले तरी मी ते बदलत नाही त्यामुळेच मोठं मोठे विद्वानही याच्याशी वाद घालून काही उपयोग होणार नाही म्हणत माझा नाद सोडून देतात. मुळात आपल्या धर्मात लग्न केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही . लग्न केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हा फालतू विचार नंतर कोणी तरी स्वार्थापोटी घुसडलेला आहे माझ्या जे वाचनात आले त्याप्रमाणे पूर्वीच्या ऋषींचे असे मत होते की प्रत्येक पुरुषाने लग्न करण्याची गरज नाही. खरं तर खूप भटजी कित्येकांना एक प्रश्न नेहमी विचारतात तुमच्या घरात कोणी बिनलग्नाचा वारला होता का कोणी निरवंशी होऊन वारला होता का? असा कोणी ना कोणी प्रत्येक घराण्यात असतोच! त्या अविवाहित आणि निरवंशी लोकांना विनाकारण बदनाम केले जाते आणि त्यांच्या नावाने शांती करून पैसे उकळले जातात. मागच्या पिढीने पाप कर्म करून कमावलेला पैसा जर पुढच्या पिढीकडे आला असेल त्या सोबत काही दोषही येतात. कारण पापाच्या पैशाचे तुम्ही भागीदार होता तसे पापाचेही भागीदार होता यालाच कदाचित ज्योतिष शास्त्रात पितृदोष म्हणत असावेत.
पितृदोषा बाबत असे म्हटले जाते की तो एकाच्या कुंडलीत जरी असेल तर त्याच्या घराण्यातील सर्वांच्या कुंडलीत असतो. माझ्या पत्रिकेत मंगळ दोष आहे. त्यामुळेच कदाचित माझ्या आयुष्यात डझनभर तरुणी येऊनही माझा विवाह झाला नाही. असं ही म्हणता येईल की त्यातील एकही मला तिच्यात फार गुंतवून ठेऊ शकली नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा लेखक होण्याचा कोणताच विचार माझ्या मनात नसताना मावशीने विचारल्यावर मी असं कसं म्हणून गेलो की मला लेखक व्हायचे आहे त्याचे उत्तर मला माझ्या जन्म कुंडलीत सापडले माझ्या सप्तमात व्ययेश बुध आहे त्यामुळेच माझ्या शब्दांना तलावारीसारखी धार आहे. माझ्या शब्दांनी खूप लोक घायाळ होतात. म्हणूनच मी मौनव्रत धारण करतो! मला मौन पाहून बोलायला सांगणे हा कित्येकांचा गाढवपणा ठरतो कारण मी नेहमी सत्याचीच बाजू घेतो. माझे बोलणे खोडून काढणे भल्या भल्याना शक्य होत नाही. खूप बारीक बारीक गोष्टींचे माझे निरीक्षण सुरू असते त्यामुळे वेळ पडल्यावर मी कोणाचीही पिसे काढतो. त्यामुळे शहाणी लोक शक्यतो माझ्यापासून लांबच राहतात. माझ्या लग्नात हर्षल आणि चंद्र आहे त्यामुळेच माझ्यात अचाट कल्पनाशक्ती आणि संशोधक वृत्ती निर्माण झाली आहे त्यामुळेच मी कथा लेखक झालो. हर्षल मुळेच माझा स्वभाव किंचित विक्षिप्त आणि रागीट झाला आहे. मला अन्याय सहन होत नाही मग तो कोणी कोणावर का करत असे ना! मला शिक्षण अर्धवट सोडावे लागले खूप प्रयत्न करूनही मला माझे शिक्षण पूर्ण करता आले नाही. याचा दोष मी माझ्या आई – वडिलांना देतो पण वास्तवात हा दोष माझ्या कुंडलीत पंचम स्थानी असलेल्या केतुचा आहे पण त्याच केतूने मला ज्योतिष शास्त्राचे ज्ञान सहज मिळून दिले माझ्या विवाहात होणाऱ्या विलंबाला हा केतूही मंगला इतकाच कारणीभूत आहे. माझा जन्म राहूच्या महादशेत झाला होता म्हणूनच त्या काळात मला त्या काळात माझ्या हाताला यश होतं. माझ्या आयुष्यात बऱ्याच स्त्रिया होत्या. प्रत्येक धंद्यात मला फायदा व्हायचा!
क्रमशः
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply