त्याने तिला शोधले
हे सर्वाना माहित होते
तो तसा संसारी माणूस
अत्यंत हळवा पण प्रसंगी
तितकाच आग्रही , महत्वाकाक्षी
हळूहळू तो तिच्यात गुरफटू लागला
संसारी माणूस तो
घरात दुरी आणि दरी वाढू लागली…..
ती बेफामपणे पुढे जात होती
तो फरफटत होता….
त्याला फरफट असह्य होत होती…
शेवटी तो शांत झाला
झोपला तो झोपलाच…
आज त्याचे झोपणेही
एक दंतकथा झाली आहे…
आणि ती पण एकटी असते
सर्व काही असूनही
त्याचा उल्लेख झाला की
तिची नजर क्षणभर स्थिर होते…
कारण ती एकमेव असते,
एकच एकटी असते…
कारण ती त्याची वहिदा होती ……..
— सतीश चाफेकर.
Leave a Reply