‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार दिग्दर्शक व गीतकार पुरुषोत्तम दारव्हेकर यांचा जन्म १ जून १९२६ रोजी झाला.
पुरुषोत्तम दार्व्हेकर हे नाट्य वर्तुळात मास्तर या नावाने परिचीत होते. अतीशय अभ्यासू, विचारवंत आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते. ते संगीत,आयुष्यभर जगले आणि त्याची परिणति म्हणजे संगीत नाटक कट्यार काळजात घुसली. संगीत आणि कविता हा त्यांचा बालपणा पासूनचा गुण. तेजो निधी लोह गोल, हे गीत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहीले. त्यांचा जन्म शिक्षण नागपुरातील B. Sc. B. T., M. A. LL.B. with Gold Medal एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी नाट्यक्षेत्रात पाय रोवला. १९५१ मध्ये रंजन कला मंदिर या नावाने नाट्यसंस्था काढली, लहान मुलांचे साठीही त्यांनी नाटकांची निर्मिती केली. १९६१ साली त्यांनी दिल्ली येथे दूरदर्शनचे सहाय्यक संचालकपद सांभाळले, ज्येष्ठ नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला.
पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. मास्तरांनी नाटकाला आपल्या अपत्यासारखे जपले. त्यांच्या नाटकांवर विदर्भासह, इंदोर, दिल्ली, जबलपूरच्या रसिकांनीही भरभरून प्रेम केले. चंद्र नभीचा ढळला नाटकाचे १६ प्रयोग, काळी माती : खारे पाणीचे सहा प्रयोग, वर्हाडी मानसंचे २६ प्रयोग, नयन तुझे जादुगारचे २९ प्रयोग, वाजे पाऊल आपले चे २१ प्रयोग त्यांनी केले. व्यावसायिक रंगभूमीवर अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. तात्यासाहेबांनी तर नटसम्राट हे नाटक मास्तर दिग्दर्शित करणार असतील तरच मी देईन, असे म्हटले होते.
त्यांची बालनाटिका होत्या, उपाशी राक्षस, कबुलीवाला, मोरूचा मामा, पत्र्यांचा महाल, नारदाची शेंडी —–अब्रा -कि-डब्रा.
त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेले ’कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड आहे. या नाटकाने मराठी रंगभुमीवर इतिहास घडवला ! पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं लेखन -दिग्दर्शन ! पं. जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत ! डॉ. वसंतराव देशपांडे यांचा स्वर ! आणि प्रभाकरपंत पणशीकर यांच्या ‘नाट्यसंपदा’ या संस्थेची निर्मिती : एक स्वर्गीय नाट्यानुभव !
पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन २१ सप्टेंबर १९९९ रोजी झाले. पुरुषोत्तम दारव्हेकर यांना आपल्या समूहातर्फे आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply