दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमातून एकाच वेळी देशभरात होणारी जाहिरात, त्यातून मिळणारे उत्पन्न ही व्यवसायाची एक चांगली संधी अनेकांना दिसत होती. त्यातच १९९१ साली नरसिंह राव सरकारने सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये ब्रॉडकास्टीग क्षेत्रात खासगी कंपन्यांनादेखील दूरचित्रवाणी सेवा मर्यादित स्वरूपात सुरू करण्याची परवानगी दिली. ही संधी १९९२ मध्ये झी ने साधली व २८ सप्टेंबर १९९२ ला आपली झी टीव्ही ही, हिंदी जनरल एंटरटेनमेंट वाहिनी सुरु केली. झी टीव्ही ही पहिली खाजगी हिंदी वाहिनी ठरली व त्यानंतर अनेक खाजगी वाहिन्या सुरू झाल्या.
झी वाहिनीने सुरुवात हिंदीपासून केली तेव्हा त्यांचा साचा हा सुरुवातीच्या काळात सर्व कार्यक्रम एकाच वाहिनीत असा होता. पुढे झी न्यूज, झी मराठी, झी २४ तास, झी युवा, झी वाजवा अशा अनेक झीच्या वाहिन्या आल्या. प्रत्येक प्रादेशिक पातळीवर झी वाहिन्या आल्या. या झी टीव्हीवर १९९३ च्या सुमारास सर्वात प्रथम झी हॉरर शो हा कार्यक्रम सुरू केला. पण १९९६ मध्ये झी सिनेमा आणि झी न्यूज या दोन स्वतंत्र वाहिन्या सुरू झाल्या. १९९९ मध्ये तर पाच वाहिन्यादेखील सुरू झाल्या. अल्फा मराठी ही त्यापकीच एक होती. झी ने नंतर प्रचंड विस्तार केला. आज १० भाषांमध्ये ५४ च्या आसपास वाहिन्या अशी त्यांची व्याप्ती आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply