सोहळे साजरे करुनि घ्यावे
परंपरेला जपुनी ठेवावे
लाड करावे स्वतःचे
स्वतःसाठी!!
अर्थ–
दीप अमावस्या, कलियुगात हिलाच गटारी म्हणून संबोधले जाऊ लागले आणि आपल्या सुंदर परंपरेचा काही प्रमाणात का होईना पण ऱ्हास होऊ लागला. अमावस्या म्हणजे वाईट, या दिवशी काही चांगलं करू नये, बाहेर जाऊ नये या सगळ्या गोष्टी मोडून काढत गटारीला या उलट गोष्टी कश्या करता येतील याला महत्व दिलं जाऊ लागलं. श्रावण सुरू व्हायच्या आदल्या दिवशी यथेच्छ मांसाहार, मद्य प्राशन करावे आणि दुसऱ्या दिवशी पासून कडक उपास करण्यास तयार राहावे.या सगळ्या आत्मिक आणि क्षणिक आनंदात आपण आपली परंपरा, सण यांना किती दुर्लक्षित करतोय हे कोणाच्या लक्षात येत नाही. केवळ पाच पैसे जास्त मिळावेत म्हणून या गटारीला वरचं स्थान दिलं जातं आणि दीप अमावस्या मद्याच्या प्रवाहात बुडून जाते.
आता गणपती येतील, या वर्षी कोरोना मुळे सार्वजनिक गणेशोत्सव होणार नाहीत अशी आशा आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सव साजरे न होणं काळाची गरज आहे कारण त्याचा मूळ हेतू हा कित्येक दशके आधीच बासनात बांधुन माळ्यावर ठेवला गेला आहे. काही गोष्टी या स्वतः साठी म्हणून कराव्यात. त्यातून जास्त आनंद आणि सुख नक्कीच मिळते. पण जिथे त्या गोष्टीला भडकपणा ची झालर प्राप्त होते तेथे दैवत रहात नाही.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply