नवीन लेखन...

आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी प्रमोद व्यंकटेश महाजन

आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी प्रमोद व्यंकटेश महाजन यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४९ रोजी झाला.

मराठवाड्यासारख्या मागास भागात जन्मलेले प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी व आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते. त्यांचा जन्म मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथे झाला. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. प्रकाश आणि प्रवीण ही त्यांच्या भावाची आणि प्रतिभा आणि प्रज्ञा ही त्यांच्या बहिणींची नावे आहेत. ते २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. नाटकांच्या सामायिक आवडीमुळे परिचय झालेल्या रेखा हमीने यांच्याशी ११ मार्च, १९७२ रोजी त्यांचे लग्न झाले. पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायऱ्या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५ मध्ये प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली. ते एक पक्के व्यावसायिक राजकारणी होते. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे ते पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. महाजन हे भारतीय जनता पक्षातील दुसर्या पिढीतील मोठे नेते होते. त्यांनी खोलेश्वर महाविद्यालयात इंग्लिशच्या अध्यापनाचे काम १९७१ पासून १९७४ पर्यंत केले.

आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले.

प्रमोद महाजन यांनी १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले.

प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता. आधी जनसंघ आणि नंतर भाजपचा प्रचार करताना या दोघांनी पक्षाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात घट्ट रूजविली होती. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिटम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावे असे प्रमोद महाजनांचे म्हणणे होते. त्यामुळे मुंडेंचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषतः स्वतःच्या मतदारसंघावर असायचे.

शंकररावांच्या नंतर अलीकडच्या टप्प्यात राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती. नावातच पी.एम.ही अद्याक्षरे घेऊन निघालेले प्रमोद महाजन पंतप्रधानपदाच्या दिशेने वेगाने घोडदौड करीत होते. अटल वाजपेयींनंतर कोण? असा प्रश्न निर्माण होताच दोनच नावे समोर यायची ती म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन. त्यातल्या त्यात महाजनांचे व्यवस्थापन कौशल्य उत्तम असल्यामुळे वाटाघाटीच्या राजकारणात ते यशस्वी होतील, असे नेहमी वाटायचे.

सध्या जमाना संमिश्र सरकारचा आहे आणि या संमिश्रपणात आपले महत्त्व कायम ठेवण्याची कला प्रमोद महाजनांना अवगत होती. त्यामुळे ते पंतप्रधान बनतील, अशी एक आशा होती.

प्रमोद महाजन यांची ३ मे २००६ रोजी हत्या झाली.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..