त्याला कुठे कळली तिची भावना
परी गुंतून जाते ती पुन्हा पुन्हा
त्याला कुठे कळल्या तिच्या जाणिवा
परी ती मिटते रोज आठवणीत त्याच्या
त्याला कुठे कळल्या तिच्या वेड्या मागण्या
परी ती मोहरते नकळत त्याच्यात कितीदा
त्याला कुठे कळले तिचे शब्द खूप सारे
परी रोज मांडते ती शब्दांतून भाव खुळे
त्याला कुठे कळला तिच्या मनाचा कोना
परी अंतरी खुणावतात त्याच्या जाणिवा
त्याला न कळली ती एक वेडी
परी त्याच्यात गुंतली अबोल ती खरी
त्याला न कळली तिची भाव व्यथा
परी व्याकुळ ती एकांती हळवी कथा
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply