ओथंबल्या पापण्यात भाव
अलगद टिपून आहे
सांज खुणावे हलकेच
ओल गंधित अत्तरात धुंद आहे
मोहरल्या तारकात चांद
टिपूर सजून आहे
आकाश दुधाळ पोर्णिमेचे
रात्र मखमली मोहरुन आहे
स्पर्श तुझा हवाहवासा
रातराणी गंधित आहे
अलवार लाजले मी जराशी
लाजणे तुझ्यात गुंफून आहे
मलमली मोहक मिठी तुझी
गंधाळून पारिजात आहे
सांडले मोती आल्हाद हृदयी
स्वातीची सर अंतरी भिजून आहे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply