दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुकवारी जागतिक शाई पेन (फाउंटन पेन) दिवस साजरा केला जातो.
फाउंटन पेनचा इतिहास.
बोरू/पीस हे टोकदार करून शाईत बुडवून मानव लिहिता झाला. दौतीत बोरू/पीस बुडवून लेखन करताना शाईचा प्रवाह कधी अपुरा तर कधी प्रमाणाबाहेर होत असे, तसेच शाई संपल्यावर लेखणी परत दौतीत बुडवावी लागे. पर्यायाने लेखनात खंड पडे. त्याकरिता कायम शाई बरोबर ठेवावी लागे. ती द्रवरूप असल्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना सांडण्याची शक्यता वाढत असे व हे गैरसोयीचे ठरू लागले. मग प्रयत्न सुरू झाले की शाईची बाटली बरोबर बाळगण्याऐवजी पेनमध्येच साठवून ठेवता आली तर? १८५० पासून असे पेन बाजारात आले. अशा शाईच्या पेनमध्ये धातूची निब असते. या निबमध्ये मधोमध एक भेग असते व त्याच्या मुळाशी एक भोक असते. शाई साठवण्यासाठी निबच्या विरुद्ध बाजूस नळीत द्रवरूप शाई भरलेली असते. कागदावर निब ठेवली असता शाई गुरुत्वाकर्षणाने निबकडे येते. पण हा शाईचा प्रवाह नियंत्रित नसल्याने कागदावर शाई जास्त प्रमाणात उतरत असे. शाईचा प्रवाह नियंत्रित व्हावा त्यासाठी निबकडून शाईच्या नळीकडे तीन अतिशय बारीक केशिका ((Feeder) असतात. त्या नळीत व बाहेर हवेचा दाब (वातावरणीय) समान असल्यामुळे हवा आत गेल्याशिवाय शाई बाहेर येणे शक्य नाही. त्याकरिता निबवर असलेल्या भोकाकडून एक केशिका हवा टाकीपर्यंत घेऊन जाते व हवा विरुद्ध दिशेने शाईला तीन केशिकामधून निबकडे ढकलते. तरी शाई अतिरिक्त येऊन लिखाण खराब होऊ शकते. अशा वेळी अतिरिक्त शाई रोखून धरण्याकरिता निबच्या खाली प्लास्टिकचे कलेक्टर असते. केशिकांमधून शाई येऊन कागदावर उतरण्यामागे केशाकर्षण (Capillary Action) हा सिद्धांत आहे. केशाकर्षणामुळे एखाद्या बारीक व्यासाच्या नलिकेतून द्रव गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेस म्हणजे वर चढते. एकदा शाई कागदापर्यंत आली की संजनशील बल (Cohesive Force) मुळे ती शाईच्या इतर रेणूंना आकर्षून घेते व हा शाईचा प्रवाह अविरत चालू राहतो. असे शाईचे पेन अतिशय लोकप्रिय झाले.
ही शाई प्लास्टिक कलेक्टर असूनदेखील गळत असे. ती टिपून घेण्याकरिता पुनश्च केशाकर्षण सिद्धांताचा वापर करीत टीप कागद बाजारात आले. मात्र, शाईचा द्रावक पाणी असल्याने ती वाळायला थोडा वेळ लागे. शाईचा अखंड पुरवठा कसा करता येईल यासंबंधी प्रयत्न झाले व त्यातूनच फाउंटन पेनाचा शोध लागला. शाईचा पुरवठा सतत होणारी लेखणी तयार करावयाचे प्रयत्न फार पूर्वीपासून सुरू होते. मध्ये बार्थोलोम्यू फॉश यांनी शाईचा साठा असणारी पण गुंतागुंतीची रचना असणारी एक लेखणी तयार केली. यापेक्षा अधिक गुंतागुंतीची रचना असलेली लेखणी मध्ये जॉन शेफर यांनी तयार केली. त्याचवर्षी जे. एच्. ल्यूईस यांनी शाईचा साठा असणारी क्किल लेखणी तयार केली. या लेखणीलाच पहिले फाउंटन पेन असे म्हटले जाते. आधुनिक पेनाचे हे पूर्वरूप होय.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply