कुणी कुणाचं नसत,
फक्त मन आपलं असतं.
सुखाचे सोबती खूप असतात!
दुःखात वाटेकरी कुणी नसतात.
प्रत्येक टप्पा इतरांसाठी असतो,
मग आपलं जगणं कुणासाठी असतं?
इच्छा,मोह पण आपले नसतात
मनाच्या ताब्यात ते दडलेले असतात!
काही अस स्वतःच माणसाचं
आयुष्यात शाश्वत असं नसतं.
तरीही आयुष्यभर माझं,माझं
म्हणुन माणूस त्यात गुरफटतो!
जीव देणारा,नेणारा सूत्रधार
दिसत नाही कधी,
पण अस्तित्व माझं मान
हीच इच्छा असते त्याची!!
किती ही केलं तरी
लोभ काही सुटत नाही,
आणि माणसाचे जगण्याचे
भोग काही संपत नाही.
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply