एक बाई पाहिजे…
घराला मायेच घरपण देण्यासाठी,
चार भिंतींना बांधून ठेवण्यासाठी
एक आई पाहिजे…
संस्कारांची शिदोरी देण्यासाठी,
मायेनं कुशीत घेण्यासाठी
एक ताई पाहिजे…
हक्काने पाठीशी घालण्यासाठी,
मनातलं गुपित सांगण्यासाठी
एक उमलती जाई पाहिजे…
आपलं बालपण पाहण्यासाठी,
प्रेमाचा झरा वाहण्यासाठी
एक जाईची आई पाहिजे…
आपलं सुखदुःख वाटण्यासाठी,
साठीला साथ देण्यासाठी
एक मायेची अंगाई पाहिजे….
निवांत घरट्यात विसावण्यासाठी,
घरट्यातला गोडवा गाण्यासाठी
एक खंबीर जिजाई पाहिजे
शिस्तीचे बाळकडू पाजण्यासाठी,
वेळीच तोल सावरण्यासाठी
पण एक तरी बाई
आयुष्यात पाहिजेचं पाहिजे
सगळ्या भूमिका निभावण्यासाठी!!!
— वर्षा कदम.
Leave a Reply