नवीन लेखन...

पूर्णविराम

शालेय जीवनामध्ये अनेक चिन्हे व त्यांचे महत्व आपण शिकलो. एखादा निबंध लिहायचं असला की कुठे स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, प्रश्नचिन्ह.. .. द्यायचे ते शिकवले जायचे. एखाद्या कथेला वेगळे वळण द्यायचे असेल तर पूर्णविराम देऊन नवीन सुरुवात करावी अशी समज दिली जायची. ह्या पूर्ण विरामाने कथेचे रूपच बदलून जायचे. तसेच हे चिन्ह लावणे ही किती सोपे. प्रश्नचिन्ह काढायला थोडा वेगळा वेळ दयावा लागायचा. ते वाकडे तिकडे वळण दयायला जमायचे ही नाही. शालेय जीवनात जे शिकलो, समजलो ते व्यावहारिक जीवनात करणे हयात खूप अंतर आहे ह्याची जाण आज होतेय.

जीवनाच्या शाळेमध्ये मात्र उलट स्थिती असल्याचे अनुभवतो. आज आपण जर एखाद्या परिस्थितीतून जात असू व त्यावेळी आपल्याला कोणी सांगितले की ‘जाऊ दया ना, सोडा आता विसरून जा, विराम दया’, तर ते करणे किती कठीण असते ते आपण सर्वच समजतो. एखादी व्यक्ति समस्या, स्थान.. .. अश्या अनेक गोष्टींना घेऊन प्रश्नचिन्हाचे जाळे आपण तयार करतो. प्रश्नांची रांग लागते. एकेकाचे उत्तर शोधणे कठीण होऊन जाते आणि हे सर्व करताना आपण मानसिक रित्या किती थकतो हे ही आपण अनुभवतो. आज अश्या प्रश्नचिन्हांचा परिणाम आपल्या शरीरावर, संबंधावर.. .. व संपूर्ण आयुष्यावर कसा पडत आहे हे आपण बघतच आहोत. एका ठिकाणी चूक-अचूक ची समज असून ही जे बरोबर आहे ते करण्याची शक्ति सुद्धा गमावून बसलो आहेत. अश्या वेळी काय करावे?

आपले मन, त्यातील विचार जो पर्यन्त शांत करत नाहीत तो पर्यन्त आपल्याला खरा मार्ग सापडू शकत नाही. कधी कधी वस्तु आपल्या डोळ्यासमोर आऊन ही आपण इथे तिथे शोधतो कारण विचारांमध्ये चल-बिचल होत असते. तेच जर मन स्थिर असेल तर एखादी हरवलेली वस्तु कुठे ठेवली आहे ते सुद्धा क्लिक होते. त्यावेळी आपल्यालाच आश्चर्य वाटते की ‘अरे इतके दिवस शोधात होतो पण मिळाले नाही, आज कसं काय मला क्लिक झालं?’ जितकी विचारांची स्थिरता वाढेल तितके सर्व परिस्थितिंची अचूक उत्तरे आपल्याला दिसू लागतील. जसं पाणी जितकं स्थिर व स्वच्छ तितकेच ते पारदर्शी होते. पण तेच जर गढूळ व हलत असेल तर त्यात पडलेली वस्तु बघणे, शोधणे कठीण होऊन जाते. जीवनातील समस्यांचे ही असेच आहे. जितके आपले विचार अस्थिर होतील तितके समाधान शोधणे गुंतागुंतीचे होईल. म्हणून मनाला नेहमी शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. एखादी परिस्थिती आली तर का, कुठे, कोणी, केव्हा, कसं असे नानाविध प्रश्न करण्यापेक्षा ह्यावेळी आपल्याला काय करायला हवे हे समजण्याचा प्रयत्न करावा. त्या परिस्थितिचा चहू बाजूने विचार करण्याची सवय स्वतःला लावावी. कारण कोणताही निर्णय हा आपल्या वर्तमान, भविष्य व भूत ह्या तिन्हीवर परिणाम करतो.

आयुष्यात झालेल्या कोणत्याही छोट्या-मोठया चूकांचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. आपण बघितले असेल की कित्येकदा आपण आपल्या भूतकाळात डोकावतो व त्या घटनांचा विचार करून दुःखी होतो. जर आपल्याला आपल्या तीनही काळांना ठीक करायचे असेल तर लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक परिस्थितिंना हाताळायला हवे. कारण वर्तमानात घेतलेले निर्णय भविष्यावरती परिणाम करतात. तसेच आजचा वर्तमान उद्या भूतकाळ होईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करण्याआधी विचार करण्याची सवय लावावी. १० वेळा विचार करावा लागला तरी चालेल पण कर्म करण्याआधी विचार करावा. आज आपण प्रत्येक वेळी react करतो. आपले बहुतेक निर्णय हे समोरच्याच्या व्यवहारावर अवलंबून असतात. जर समोरचा चुकीचे वागत असेल तर आपण ही तेच करतो. म्हणून प्रत्येक वेळी attention ठेवणे आवश्यक आहे. थोडंस थांबा, विचार करा, मग पाऊल उचला. ही सवय आपल्याला अनेक समस्यांना समाप्त करण्यास मदत करेल व जीवनाचा मार्ग सरळ होईल.

भूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे. रोज स्वतःला नवीन बनवण्याचा प्रयत्न करावा. जसे रोज जर तेच तेच पदार्थ खावे लागले तर कंटाळा येतो. कपडे, वस्तु, पदार्थ.. .. ह्यामध्ये नवेपणा आवडतो तसेच विचारांमध्ये, वागण्यामध्ये ही नवीनता आणण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच आपले जगणे नवीन रूप घेऊ शकेल.

‘ नकारात्मक गोष्टींना दयाल पूर्णविराम,
तेव्हा मिळेल विचारांना आराम’

— ब्रह्माकुमारी नीता

Avatar
About ब्रह्माकुमारी नीता 44 Articles
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..