वीटभट्टी फेकं
धूर भकाभका
तिथ खेळती पोरं
चिर्रघोडी धक्का
इळभर वाहती
किरजले खंगार
आयुष्य बाळांचे
फेकलेले भंगार
मजूर फोडती
दगडांच्या बाली
लेकरांची त्यांच्या
मुकी देहबोली
ऊसतोडी माय
झोका बांध शेवरी
कारखानी चिमणी
पाचरट सावरी
रेल्वेच्या पटरी
झोपड्यांची रांग
शिक्षणाचा कोंबडा
कधी देईल बांग?
— विठ्ठल जाधव.
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार(बीड)
Leave a Reply