आरक्त देही मधुमास लुटला
तुझ्या मिठीत वसंत फुलला
मिटल्या पापण्यात आठवणी तरळल्या
उमलत्या कळ्यांचा गंध बहरला
तुझ्या ओढीत भाव धुंद उमटला
मोह मिठीचा गंधार अंतरी चेतला
घेता तू अलवार चुंबन स्पर्श गंधाळला
ओठ ओठांना अलगद भिडता चेतना तप्तल्या
ओठ हलकेच चुंबीता रोमांच तनुभर मोहरला
तुझ्यात बंध आल्हाद मखमली वेढून गेला
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply