माझा डोंंबिवलीकडील मित्र बापू राऊत याचा जन्मदिवस.. अब तक 57
बापू राऊत म्हटले तर कुणी पोक्त अशी व्यक्ती असेल असे अनेकांना वाटते , अर्थात हे 10 ते १५ वर्षांपूर्वी देखील वाटायचे . बापूचे खरे नाव राजेंद्र राऊत , आमच्या डोंंबिवलीमधील अण्णा राऊतांचा हा ‘ ज्येष्ठ ‘ मुलगा. त्यावेळी मी डोंबिवलीला प्रवीण दवणे यांच्याकडे जात असे तेव्हा त्यांच्या नामश्री सोसायटीवरून जावे लागे. त्यावेळी गॅलरीत अण्णा हटकावून उभे असत किंवा प्रवीण अण्णांना हाक मारत असे अण्णांचे हे ‘ ज्येष्ठ ‘ अपत्य त्यावेळी गॅलरीत येत असे. अण्णा राऊत म्हणजे डोंंबिवलीमधील एक मराठी साहित्याने भारलेले व्यक्तीमत्व होते. खरे तर १० ते १५ वर्षांपूर्वी ‘ बापू ‘ म्हटलं तर ही व्यक्ती ६० वर्षाची असेल असा अनेकांचा समज होता. आजही बापू 57 वर्षाचा आहे.
बापू अत्यंत उत्तम फोटाग्राफर पण सॉलिड फुटेज खाणारा होता अर्थात आता तसे नाही त्याला त्याच्या भिडस्त स्वभावामुळे फटकेही खावे लागले. बापूने काढलेला प्रत्येक फोटो खूप वेगळा असतो. त्यामागे विचार असतो परंतु त्याला त्याच्या भिडस्त स्वभावामुळे त्याच्या हातून काही चुकाही घडल्या, त्यातील मोठी चुक म्हणजे त्याने सुमारे १९९६ साली माझी पहिली मुलाखत महानगरमध्ये घेतली त्यानंतर माझा घोडा जो काही उसळला अर्थात माझ्या स्वाक्षरी छंदाच्या बाबतीत तो आजतगायत चालू आहे. ही त्याची चूक तो आजही मान्य करतो अर्थात माझी दुसरी मोठी मुलाखात टाइम्स ऑफ इंडियाच्या फोटाग्राफर अनिल शिंदे याच्यामुळे, दोघेही फोटाग्राफर , इंग्रजीत ती मुलाखत झाल्यावर मी भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचलो तर त्याच काळात मराठीमध्ये महाराष्ट्र्र टाइम्स मध्ये प्रवीण दवणे याने मुलाखत घेऊन ‘ सह्याजीराव ‘ हे पहिले टोपण नाव दिले , असो.तर बापूने ‘ रंजन तपस्वी ‘ नावाने माझी मुलाखत छापली.
खरे तर बापू घडला हा ‘ महानगर ‘ च्या मुशीतून , निखिल वागळे हे त्याचे संपादक. बापूबद्दल खूप सांगता येईल कारण तो आजही अनेक प्रकारच्या चळवळीत असतो, भाग घेतो. खरे तर आपल्याला पद मिळावे म्हणून अनेकजण धडपडत असतात तेव्हा बापू त्याचे काम त्याच्या पद्धतीने करत असतो तसे तो पत्रकार असल्यामुळे डोंबिवलीमध्ये त्याने अनेकांची ‘ वाजवली ‘ देखील आहे आहे ,अनेकांचा बुरखा फाडलाही आहे पण हे सगळे ‘ निस्पृहपणे आणि अत्यंत मनापासून . त्याला ढोंगी लोकांची खूप चीड येते वेळोवेळी तो तसे प्रकटही करत असतो.
पुढे बापूचे लग्न झाले , पत्नीने अत्यंत काळजीपूर्वक संसार करावयास पाहिजे असे ती करत आहे कारण बापूला सांभाळणे हे काही खायचे काम नाही याची तिला कल्पना होती आणि आजही आहे. त्यामध्ये बापूचे आजारपण. हल्ली बापू म्हणे स्वतःच्या तब्येतीला खूप जपतो म्हणे ? जपलेच पाहिजे ना .
या सर्वातून बापू बाहेर पडून आज 57 वर्षाचा झाला आहे त्याच्या पुढील वाटचालीस माझ्या आणि त्याच्या सर्व मित्रपरिवाराच्या शुभेच्छा.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply