३ डिसेंबर १९८४ रोजी भोपाळमध्येल यूनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती. मिथाइल आयसोनेट (एमआयसी) युनियन कार्बाइड (इं.) लिमिटेड या कंपनीच्या ६१० नंबरच्या जमिनीखालील टँकमधून अतिशय विषारी असा पेस्टिसाईड मिथाईल आयसोसायनेट (एम. आय. सी.) वायुच्या ४० टन गळतीमुळे ही दुर्घटना घडली.
तापमान २०० डिग्री पर्यंत वाढल्या ने टँकचे सेफ्टी वॉल्व उडाले होते. यात अधिकृतपणे ३७८७, तर अनधिकृत आकड्यानुसार, आठ ते दहा हजार निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले. या घटनेनंतर जागीच मरण पावणाऱ्यांची संख्या तीन हजारच्या घरात होती, तर पुढील पंधरा दिवसांत आणखी सुमारे आठ हजार जणांना आपला जीव गमवावा लागला.
त्यानंतर आत्तापर्यंत आणखी आठ हजार लोकांना या गॅसमुळं झालेल्या विविध विकारांमुळं प्राणाला मुकावं लागलं आहे. सरकारी आकडेवारीनुसार, तेव्हा पाच लाख ५८,१२५ लोक या वायुगळतीने बाधित झाले. त्यापैकी ३८,४७८ जणांना कायमस्वरूपी किरकोळ व्यंग निर्माण झालं, तर सुमारे ३९०० जणांना कायमस्वरूपी गंभीर व्यंग शरीरात निर्माण झालं. या दुर्घटनेत नेमके किती लोक मृत्यू पावले आणि किती जखमी वा बाधित झाले, याविषयी आजवर वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले गेले.
युनियन कार्बाइड इंडिया लि. हा भोपाळमधला एक महत्त्वाचा प्रकल्प होता. तो १९६९ मध्ये सुरू झाला. अमेरिकी मल्टिनॅशनल कंपनीची ही भारतातील उपकंपनी. भोपाळमध्ये ‘सेविन’ (कार्बरिल) नावाचे एक कीटकनाशक मिथाइल आयसोसायनेट व इतर काही द्रव्यांपासून बनविले जात असे. द्रव स्थितीत असलेला मिथाइल आयसोसायनेट (एमआयसी) वायूरूप अवस्थेत अत्यंत विषारी असल्याची पूर्ण कल्पना अमेरिकी, तसेच भारतीय कंपनीला होती. या एमआयसीचं रूपांतर वायूत होऊ नये म्हणून जमिनीखालच्या थंड टाक्यांमधून तो साठविला जात असे. अशा तीन टाक्या जमिनीखाली होत्या. त्यापैकी एका टाकीमधून द्रवरूपातील एमआयसीचं गॅसमध्ये रूपांतर झालं. त्या दिवशी म्हणजे दोन डिसेंबर १९८४ च्या रात्री कंपनीत पाण्याच्या टाक्यांची साफसफाई हाती घेण्यात आली. त्या वेळी पुरेशी काळजी घेतली न गेल्यानं हे पाणी जमिनीखालच्या ‘एमआयसी’च्या टाकीत शिरलं. तिथून मग गळती सुरू झाली. या गळतीनंतर अत्यंत प्राणघातक अशा एमआयसी आणि अन्य वायूंचा एक ढगच तयार झाला आणि कंपनीतून हा ढग आग्नेय दिशेनं नेमका भोपाळ शहराच्या दिशेने झेपावू लागला. या ढगात एमआयसीव्यतिरिक्त फॉस्जेन, हायड्रोजन सायनाइड, कार्बन मोनोक्साइड, हायड्रोजन क्लोराइड, नायट्रोजनचे ऑक्साइड्स, मोनोमेथिल अमीन आणि कार्बन डायऑक्साइड आदी विषारी किंवा हानीकारक वायू होते. या ‘ढगा’त कुठले वायू तयार झाले, याबाबत युनियन कार्बाइडने अधिकृतरीत्या कुठलीही माहिती आजतगायत दिलेली नाही.
भोपाळ शहरातील पोलिसांच्या नाइट पेट्रोलिंग युनिटनं जवळच्या पोलिस कंट्रोल रूमला रात्री १.२५ च्या सुमारास पहिल्यांदा बातमी कळविली, की कसलासा वायू पसरला आहे आणि लोक घाबरून पळत आहेत. रात्री दोनच्या सुमारास कंट्रोल रूममधील फोन सतत खणखणू लागले.तीन डिसेंबरची सकाळ उजाडली. सकाळी सहा-साडेसहा वाजेपर्यंत या घटनेची तीव्रता सर्वांच्याच लक्षात आली. विषारी वायूनं घातलेलं थैमान सर्वांना दिसू येऊ लागलं. मृतदेह भोपाळ मेडिकल कॉलेजच्या आवारात पोस्टमॉर्टेमसाठी येऊ लागले. पुढं कित्येक दिवस हा जीवन-मृत्यूचा खेळ सुरू राहिला.
या दुर्घटनेची व्याप्ती एवढी मोठी होती, की वैद्यकीय पथके अपुरी पडली. अशा प्रकारच्या विषारी वायुगळतीवर उपचार करण्यासाठी तेव्हा आपल्याकडं कुठलीही सुसज्ज यंत्रणा नव्हती. अनेक मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी थोड्या कालावधीत, परिसरातील सर्व झाडं नष्ट झाली. सुमारे दोन हजारहून अधिक जनावरांचे मृतदेह पुरावे लागले. फुफ्फुसाचा कर्करोग, मूत्रपिंड बंद पडणो, यकृताच्या आजाराने अनेक जण मरण पावले. भारत सरकारनं १९८५ मध्ये अमेरिकी कोर्टात युनियन कार्बाइडविरुद्ध ३.३ अब्ज डॉलर भरपाईचा दावा लावला. शेवटी १९८९ मध्ये भारत सरकार आणि युनियन कार्बाइड यांच्यात कोर्टाबाहेर समझोता झाला आणि भारत सरकारनं अवघ्या ४७ कोटी डॉलर भरपाईवर समाधान मानलं. महाभयंकर दुर्घटना असूनही युनियन कार्बाईडने अत्यल्प नुकसानभरपाई दिली.
प्रगत राष्ट्रांत दिल्या जाणा-या भरपाईच्या तुलनेत तर ती खिजगणतीतही नाही. युनियन कार्बाईडचे अध्यक्ष वॉरन अँडरसन यांच्यासह नऊ जणांना अटक करण्यात आली होती. परंतु अँडरसनची दोन हजार डॉलरच्या जामीनावर मुक्तता झाली होती. तेव्हाहपासून अँडरसन अज्ञातवासात असल्या सारखे जीवन जगत होता.
९२ वर्षीय अँडरसनचा २९ सप्टेंवबर रोजी अमेरिकेतील फ्लोरिडामध्येत मृत्यूा झाला. ही बातमी समजताच, भोपाळमधील लोकांनी अँडरसनचा फोटो लावून, रांगा लावून त्यावर थुंकून आपला संताप व्यक्त केला.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply