त्याला हवा तसा हवा तेव्हा त्याचा
टाईमपास तिच्याबरोबर झाला
तिच्या दुखऱ्या मनाच्या अजून
मग चिंधड्या लाख उडल्या..
आता ती किती चूक हेच
फक्त त्याच्या लेखी उरलं
कितीही अपमान त्याने केले
तरी तीच दुःख त्याला न कळलं..
मन आणि भावनांची तिची कहाणी
त्याला कधी कळणार नाही..
तिच्या मनाची जाणिव त्याला
दिसणार कधीच ती नाही..
त्याचा ती टाईमपास झाली
तिला तो आवडला हीच चूक तिची झाली
तो पुरुष आणि ती स्त्री हाच फरक उरला
तिच्या मनाचा गाभा त्याला न कळला..
प्रश्न मिटवले लोकं आयुष्यातून खोडूनी
तरी आठवणी मिटत कधीच नाही
बहर कसाही असो मनाचा ओला
ऋतुचक्र बदलते पण मन पुन्हा उमलत नाही..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply