नवीन लेखन...

आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस

७ डिसेंबर १९४४ रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली. हवाई सेवांमध्ये सुधारणा, संरक्षण, मार्गांची निश्चिती, परिवहन आदी व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे, हा या दिवसाचा उद्देश होता. त्यामुळे जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) साठीदेखील हा दिवस महत्त्वाचा असतो. या दिवशी आणखी एक महत्त्वाची घटना घडली होती. क्वांटस एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ४४९ प्रवाशांचे प्राण वाचवले होते.

आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवसाच्या निमित्ताने जगातील सर्वात उंच चार एटीसी टॉवर्स आशियात (थायलंड, मलेशिया, जपान, चीन) असून तीन अमेरिकेत आहेत.

रॉयल डच ही सर्वात पहिली एअरलाइन असून १९१९ मध्ये तिची सुरुवात झाली होती. १७ मे १९२० रोजी या एअरलाइनच्या पहिल्या विमानाने अॅम्स्टर्डमहून लंडनच्या दिशेने प्रयाण केले होते. त्यानंतर क्वांटस (१९२०) एअरलाइन सुरू झाली.

बोइंग ७४७-४०० एसच्या कॉकपिट विंडो फ्रेमचा खर्च एका लक्झरी कारच्या खर्चाएवढा आहे. त्याची वायरिंग २८० किमी लांबीची असते.

अलास्का एअरलाइनने सर्वप्रथम १९९९ मध्ये ऑनलाइन चेक इन सेवा सुरू केली.
विमानाचा वैमानिक आणि सहवैमानिकाला वेगवेगळे भोजन दिले जाते. विषबाधा झाल्यास यापैकी एक जण तरी विमान सांभाळू शकेल, हे यामागील कारण.

चीनमधील काम्दो-बांग्दा येथील धावपट्टी जगात सर्वात लांब (५.५ किमी) असून ती तिबेट क्षेत्रात येते. त्यानंतर रशिया व फ्रान्सचा क्रमांक लागतो.

– १ जानेवारी १९१४ रोजी अमेरिकेत पहिल्या व्यावसायिक प्रवासी विमानाचे उड्डाण फ्लोरिडा बेपासून टेंपा येथील सेंट पीटर्सबर्गकडे झाले होते.

२०१५ मध्ये जगातील सहाव्या सर्वात व्यग्र विमानतळाचा मान लंडनमधील हिथ्रो विमानतळाला मिळाला. त्यापूर्वी टोकियो, शिकागो, दुबई, बीजिंग आणि अटलांटाचा क्रमांक लागला.
लंडनहून पॅरिसकडे जाणाऱ्या विमानात १९१९ मध्ये सर्वप्रथम नाष्ट्यासाठी रोख घेतली गेली.

एअर पोर्ट हा शब्द पूर्वी १७८० मध्ये जहाज व्हेंटिलेशनसाठी तयार केलेल्या जागेसाठी किंवा छिद्रासाठी वापरला जात असे. १९०२ मध्ये हा शब्द सर्वप्रथम विमानांसंदर्भात वापरला गेला.

संकलन : संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..