जागतिकीकरण तोंडावर आलं असताना आपलं प्रादेशिक वेगळेपण जपण्याच्या उद्देशाने सार्कची ८ डिसेंबर १९८५ ला ढाका येथे स्थापना झाली. भारत हा सार्कमधील सर्वात बलाढ्य देश आहे. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सार्कच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता. सार्क अर्थात दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचा उद्देश परस्पर सहकार्यातून भारतीय उपखंडाला शांतता आणि समृद्धी मिळवून देणं, हा आहे.
प्रारंभी सार्कमध्ये भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका व मालदीव असे सात देश सदस्य होते. २००७ मध्ये अफगाणिस्तानचा आठवा सदस्य म्हणून समावेश केला गेला. चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह ९ देश व संघटनांना सार्कमध्ये ‘निरीक्षक दर्जा’ दिला आहे. दक्षिण आशियामध्ये सामूहिक बाजारपेठ निर्माण करणे या प्रमुख उद्देशाने सार्कची निर्मिती करण्यात आली. सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे.
सार्क देशांच्या राष्ट्रप्रमूखांनी दरवर्षी शिखर संमेलनात भाग घेऊन आपल्या अडीअडचणींविषयी चर्चा करावी, अशी कल्पना होती. पण सध्या आपापसातील इगो प्रॉब्लेममुळे काही देश या संमेलनावर बहिष्कार टाकतायत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या तणावाचा सार्कला मोठा फटका बसतोय.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply