‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ या नाटकातील अभिनयामुळे रसिकांच्या मनात घर करून असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे या नावाप्रमाणेच सतत हसतमुख असणारी मराठी नाट्य चित्रपटसृष्टी मधील उत्तम अभिनेत्री आहेत. त्यांचा जन्म ९ डिसेंबर रोजी झाला.
सुरुवातीच्या काळात पडद्यावर मुख्य नायिकेच्या मागे नृत्य करत असतानाच, डोळयात आपणही एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुढे येण्याचं स्वप्न बघून, मोठ्या जिद्दीने त्यांनी आपल्या कारकिर्दीला नवं सुरेख वळण दिलं आणि थोड्याच कालावधीत त्यांनी उत्तम ‘अभिनेत्री’ म्हणून आपलं स्वतःचं असं निराळं स्थान निर्माण केलं.
‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘चिरंजीव आईस’, ‘कुलकर्ण्याचं स्थळ’, ‘मंगळसुत्र’ आणि ‘सासुबाईंचं असंच असतं’ अशा अनेक नाटकांमधून. तर, ‘आई शप्पथ!’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘आम्ही दोघे राजा राणी’, ‘गडबड घोटाळा’, ‘धग’, ‘मानाचं कुंकू’, ‘हिरवा चुडा सुवासिनीचा’, ‘माहेरची साडी’ अशा अनेक मराठी, तर, ‘कथा’, ‘वक्त के पहले’, ‘सिंघम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या लाजवाब अभिनयाने कधी खाष्ट सासू, तर कधी प्रेमळ आईच्या भूमिकेत रसिकांच्या मनात घर केले.
विजय पटवर्धन
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply