पुणे ठरणार पादचारी दिन साजरा करणारं देशातील पहिलं शहर !
सार्वजनिक वाहतुकीत पादचारी हाही अत्यंत महत्त्वाचा घटक असून पादचारी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, त्याचे महत्त्व समजावे, या उद्देशाने पुणे महापालीकेने आज ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा करण्याचे ठरवले असून पुणे शहर हे पादचारी दिन साजरा करणारे देशातील पहिले शहर असणार आहे.
पादचारी दिनाच्या निमित्ताने शहरातील पादचारी मार्गांची दुरुस्ती, पादचारी भुयारी मार्गांचे नूतनीकरण, सीसीटीव्ही कॅमेरा, झेब्रा क्रॉसिंग आणि लाईट्स अशा विविध विषयांवरही काम करण्यात आले आहे. हा उपक्रम म्हणजे केवळ एकदिवसीय इन्व्हेंट न करता, यात भरीव काम पुणे महापालीकेने केले आहे.
भारतातील अनेक शहरांमध्ये सहसा पादचाऱ्यांची सोय आणि सुरक्षितता ह्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. पुण्यामध्ये मात्र स्ट्रीट डिझाईन गाईडलाइन्स, पादचारी धोरण, नॉन मोटर राईड वाहतूक समिती अशा अनेक घटकांमुळे हे चित्र पालटण्यास काही अंशी सुरुवात झाली आहे. तरीही या सुधारणांना अजून व्यापक पाठिंबा मिळाल्यास आपले शहर खऱ्या अर्थाने पादचारी- स्नेही होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल. पर्यावरण दिन, महिला दिन असे दिवस गेली कित्येक वर्षे सातत्याने साजरे झाल्यामुळे त्या त्या विषयाबाबत बरीच जागृती आणि सुधारणा होण्यास हातभार लागला आहे. पादचारी दिन साजरा केल्यानेही असाच फरक पडेल, ही ह्या दिनामागची संकल्पना आहे.
पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था यात सहभागी होणार आहेत, या पादचारी दिवसाच्या निमित्ताने आपणही या उपक्रमात सहभाग नोंदवावा.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply