नवीन लेखन...

प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचणारा रॉल्ड अमुंडसेन

१४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला. त्याचे पथक सुखरुप परत आले. पृथ्वीवरील सात खंडांपैकी सर्वात जास्त गूढ रहस्यांनी भरलेला एक खंड म्हणजे अंटार्क्टिका खंड होय. हा खंड सर्वांत दक्षिणेस वसला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. २१ जुलै १९८३ अंटार्क्टिकावरील व्होस्टॉक येथे उणे ८९.२ सेल्सिअस या पृथ्वीवरील कमी तापमानाची नोंद केली गेली. याआधी सर्वांत कमी तपमान -८८•३० से. हे ३,४३० मी. उंचीच्या, रशियन ठाण्यावर २४ ऑगस्ट १९६० रोजी नोंदले गेले होते. पृथ्वीवरील सर्वात कमी तापमान असणारा प्रदेश म्हणून अंटार्क्टिका प्रसिद्ध आहे. यानंतर २०१० मध्ये -९३.२℃ तापमानाचीही नोंद झाली ती या अंटार्क्टिकावरच..

पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या दक्षिण टोकालाच दक्षिण महासागर अथवा अथवा दक्षिणी महासागर म्हणतात. अशा दक्षिण महासागराने अंटार्क्टिका खंड वेढला गेला आहे. अंटार्क्टिका खंड इतर सर्व खंडांपेक्षा सर्वात अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वहात असणारा आणि सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. या खंडाचा तब्बल ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे. १,४४,२५,००० वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असणारा अंटार्क्टिका खंड हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे. याचा ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे. हे खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांपासून त्यापेक्षा पुष्कळच दूर व अलग आहे.

अंटार्क्टिका खंडावर साम्राज्य आहे ते बर्फाचेच! वास्तवात अंटार्क्टिका म्हणजे एक मोठं – महाकाय बेटच आहे. चारही बाजुंनी पाण्यानी वेढलेलं. पण इथे जमीन आणि पाण्याचं नातं फार वेगळं आहे. हिवाळ्यामध्ये तापमान सतत उणे असल्यामुळे समुद्राचं पाणी किनाऱ्यापासुन एक ते दीड हजार किलोमीटर पर्यंत गोठतं आणि ते जमिनीचाच एक भाग होऊन जातं. यामुळे अंटार्क्टिकाचे क्षेत्रफळ जवळजवळ दुप्पट होऊन जाते. पुन्हा मग जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ वितळुन पुन्हा त्याचे पाण्यात रुपांतर होते. किनाऱ्यावर व लगतच्या समुद्रावर मिळून बर्फाचे प्रचंड थरांवर थर साठलेले असतात. त्यापासून सपाट माथ्याचे मोठेमोठे हिमनग सुटून समुद्रात येतात. त्यांपैकी काहींची लांबी सु. १५० किमी. पर्यंत आढळलेली आहे. या बर्फाची कमीतकमी जाडी १९०० मीटर आहे. हा सर्व बर्फ वितळला तर पृथ्वीवरील पाण्याची पातळी सुमारे दोनशे फूट वाढेल व समुद्रकिनार्या लगतच्या बर्याफच मोठ्या शहरांना जलसमाधी मिळेल. अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्यात दक्षिण ध्रुवावर तब्बल सहा महिने आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने एकसारखा अंधार असतो. त्याचप्रकारे उन्हाळ्यात दक्षिण ध्रुवावर बाकीचे सहा महिने आणि समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात सरासरी दोन महिने एकसारखा उजेड असतो. पृथ्वी तिच्या अक्षापासुन २३.५ अंश झुकलेली असल्यामुळं उन्हाळ्यातसुद्धा सुर्य प्रकाश इथे कमी पोहोचतो तसंच जो काही प्रकाश या जमिनीवर म्हणजेच बर्फावर पडतो तो पुन्हा आकाशाकडे परावर्तित केला जातो. त्यामुळे इथे बर्फ वितळण्याचं प्रमाण हे बर्फ तयार होण्याच्या प्रमाणापेक्षा कितीतरी पटींनी कमी आहे आणि म्हणूनच बर्फाचा थर साल दरसाल वाढला गेला आहे. हा बर्फाचा थर सरासरी दोन किलोमीटर एवढा आहे. काही ठिकाणी तर हा थर साडेचार किलोमीटर पर्यंत आढळून आला आहे. अंटार्क्टिकामध्ये किती प्रमाणात बर्फ आहे हे जर उदाहरणासहित सांगायचं झालं तर समजा, जर हा पुर्ण बर्फ भारतावर आणुन टाकला तर संपुर्ण भारताची उंची तब्बल ११ किलोमीटरने वाढेल म्हणजे भारतातील कुठलंही ठिकाण हे सद्यस्थितीचे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टपेक्षा उंच होईल.

१९४३ पासून या खंडावर माणसे सतत येत जात आहेत. तथापि कायम मनुष्यवस्ती अशी नाही. जी काही माणसे येतात ती संशोधनासाठी येतात. अंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक याने १७७२ मधे लावला. त्याच सुमारास ७ जानेवारी १८२० या दिनी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावर्द्याने ५० किलोमीटर अंतरावरून बर्फाच्या डोंगरांची रांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. म्हणून त्या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते. अंटार्क्टिकासभोवतीच्या महासागराला ‘अंटार्क्टिक महासागर’ किंवा ‘दक्षिण महासागर’ म्हणतात. परंतु तो खरोखर हिंदी, अटलांटिक व पॅसिफिक महासागर यांचा दक्षिण भाग होय. या महासागरांवरून सतत वाहणाऱ्या थंड व जोरदार वाऱ्यांना जमिनीचा अडथळा कोठेच होत नसल्यामुळे हा महासागर नेहमीच अस्थिर व खवळलेला असतो. त्याच्या जोडीला अंटार्क्टिकावरून आलेले हिमनग, हिमखंड, बर्फाची चकंदळे यांमुळे हा नौकानयनास अगदी धोकादायक आहे. यामुळे अगदी अलीकडील काळापर्यंत हे खंड अज्ञातच होते. अंटार्क्टिकापासून दक्षिण अमेरिकेचे अंतर एक हजार किलोमीटर आहे, ऑस्ट्रेलिया अडीच हजार किलोमीटर, आफ्रिका चार हजार किलोमीटर आणि भारत बारा हजार किलोमीटर अंतरावर आहे.

अंटार्क्टिका हे महाकाय वादळांसाठी परिचित आहे. इथे जेवढी थंडी धोकादायक तेवढेच वेगाने धावणारे वारेसुद्धा धोकादायक आहे. या वाऱ्यांना जमिनीवर कशाचाच अडथळा होत नाही.वेगाने वाहणाऱ्या वारे आणि वाऱ्याबरोबर उडणारा बर्फ एवढे प्रचंड असतात की दगडांचा पण त्यांच्यासमोर निभाव लागत नाही. हे वारे अक्षरश: दगडांमध्ये छिद्र करतात आणि काही छिद्र तर आरपारही होऊन जातात. पृथ्वीवर असणाऱ्या उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर म्हणजेच अंटार्क्टिका मध्ये आकाशात एक नैसर्गिक लालसर आणि हिरवट प्रकाश दिसतो. इंग्रजीमध्ये याला अरोरा असं म्हणतात. अंटार्क्टिका आणि प्रदूषण यांचा काहीही संबंध नाही, इथे कुठल्याही प्रकारचे वायुप्रदूषण किंवा धुळ नाही. त्यामुळेच अंटार्क्टिका हे अंतराळ निरीक्षणासाठी पृथ्वीवरिल सर्वोत्तम ठिकाण मानले जाते. थंड तापमानामुळे हवेमध्ये पाण्याचं फार कमी असते, सर्व पाणी बर्फ बनुन खाली पडते. इथे कुठल्याही प्रकारची झाडे, वनस्पती नाहीत. ३-४ प्रकारचे पक्षी आढळतात पण तेसुद्धाफक्त समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात. अंटार्क्टिकाची खासियत म्हणजे इथे वास्तव्यास असलेले पेंग्विन पक्षी. पेंग्विन हे समुद्र आणि समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशातच वास्तव्य करतात. पेंग्विन पक्ष्यांच्या एकूण ७ जाती येथे आढळुन येतात.

याच भागात संशोधन करताना शास्त्रज्ञांना ‘किंबरलाइट’ हा दगड सापडला. हा दगड सापडणे याचाच अर्थ त्या भागात हि-यांचा मोठा साठा सापडल्याची ही खूण आहे. आफ्रिका, सैबेरिया आणि ऑस्ट्रेलियातही ‘किंबरलाइट’ हा दगड सापडणे म्हणजे हि-यांच्या खाणी असणे असा होतो. मात्र, अंटार्क्टिका खंडातून व्यावसायिक खजिन उत्पादनास बंदी आहे. ‘किंबरलाइट’ हा दगड सर्वसाधारणपणे ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार होतो. मात्र, व्यावसायिक हिरे उत्पादनात हा दगड अत्यंत उपयुक्त असतो. अंटार्क्टिकाच्या उत्तर भागातील प्रिन्स चार्ल्स डोंगर रांगातील मेरेडिथ शिखराच्या परिसराच्या उतारावर शास्त्रज्ञांना ‘किंबरलाइट’ दगड सापडले. याचाच अर्थ या भागात हि-यांचा साठा मोठय़ा प्रमाणावर दडलेला आहे.
अंटार्क्टिकाची जमीन आणि आकाश हे एकापेक्षा एक अशा नैसर्गिक चमत्कारांनी बहरलेले आहे. इकडे ना आपल्यासारखा दिवस असतो ना आपल्यासारखी रात्र. सुर्य सुद्धा पुर्वेला उगवत नाही आणि पश्चिमेला मावळत पणनाही, कधी उगवलाच तर मावळत नाही आणि कधी मावळलाच तर उगवतही नाही. इथली काही वादळं वेळ पाहुन सुरु होतात तर काही आठवडा होऊन जातो तरी थांबायचं नाव घेत नाहीत. इथे दृश्यमानता इतकी असते कि एरव्हीआपण अगदी ५० किलोमीटर दुरवरचंसुद्धा पाहू शकतो पण एखाद्या वादळात ५ मीटर वरचं पाहणंसुद्धा जिकिरीचं ठरतं. या सगळ्या गोष्टी अंटार्क्टिकाला सुनसान आणि जगापासुन वेगळं करून टाकतात. हो पण याच सर्व वैशिष्ठ्यांमुळे अंटार्क्टिकाला सर्वात थंड, सर्वात उंच, सर्वात वादळी ठिकाण म्हटलं जाते आणि सुंदर व अप्रतिम तर हे आहेच !

१४ डिसेंबर १९११ रोजी रॉल्ड अमुंडसेन हा नॉर्वे देशाचा नागरीक प्रथम अंटार्क्टिकावर पोहोचला. त्याचे पथक सुखरुप परत आले. १८ जानेवारी १९१२ ला रॉबर्ट स्कॉटही दक्षिण ध्रुवावर जाऊन पोचला. परंतु परत येताना तो व त्याचे लोक मृत्यू पावले. येथून पुढे या नव्या खंडाबाबत संशोधन सुरूच झाले. भारताने सुध्दा आपले कायमस्वरूपी संशोधन केंद्र तेथे उभारले असून त्या केंद्राला आपण ‘दक्षिण गंगोत्री’ हे नाव दिले आहे. अंटार्क्टिकावर कायमस्वरूपी राहणार्यास व्यक्तींची संख्या शून्य आहे.

— महेश दारवटकर.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..