संतोष पवार जन्म १५ डिसेंबरला झाला.
शाहिर साबळे यांच्या लोकधारेतून पुढे आलेल्या संतोष पवार यांनी आपली घोडदौड ‘यदा कदाचित’ पासून चालू केली. संतोष पवार यांनी जाणून बुजून, आम्ही सारे लेकुरवाळे, जळुबाई हळू, युगे युगे कली युगे, राधा ही कावरी बावरी, लगे रहो राजाभाई, बाजीराव मस्त मी, माझे पती छत्रीपती, यंदा कदाचित, यदा कदाचित रिटर्न्स अशा अनेक हिट नाटकांचं लेखन दिग्दर्शन केलं.
दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, माझिया भाऊजींना रीत कळेना, आलाय मोठा शहाणा, स्वभावाला औषध नाही, या नाटकांचं दिग्दर्शन आणि तू तू मी मी, राजा नावाचा गुलाम, हवा हवाई, जाऊ बाई जोरात या नाटकांमधे अभिनय केला. इतकंच नाही तर या अष्टपैलू कलाकाराने काही नाटकाचं गीत लेखनही केलं. नाटकासाठी लागणारा झपाटलेपणा त्याच्याकडे ओतप्रोत भरलेला आहे. म्हणूनच त्याने वेळ पडली तेव्हा प्रयोग रद्द होऊ नये म्हणून स्वत: लेखक दिग्दर्शक असूनही यदा कदाचितमध्ये छोट्या छोट्या भूमिकाही केल्या.
नवरा माझा नवसाचा या लोकप्रिय चित्रपटाचे संवाद लेखन त्याने केले.
फू बाई फू च्या तिस-या पर्वात किशोरी अंबियेच्या जोडीने त्यांनी विजेतेपद पटकावले होते.
संतोष पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply