चिंतामणी गणेश कर्वे यांचा जन्म बडोदा येथे झाला.
त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे सहायक म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केले. डॉ. केतकरांच्या ‘महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या’ प्रचंड कार्यात मदत केली. १९२८ मध्ये त्यांनी महाराष्ट्रीय शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, महाराष्ट्र परिचय, शास्त्रीय परिभाषा कोश अशा अनेक कोशांच्या रचनेत संपादक म्हणूनही त्यांनी मोलाचे कार्य केले. भाषा, वाङ्मय, इतिहास, संस्कृती, अशा विषयांवर त्यांनी अनेक लेख लिहिले.
‘मानवी संस्कृतीचा इतिहास’, ‘मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी’, ‘कोशकार केतकर’ असे ग्रंथ रचले. ज्ञानवंत, विचारवंत, व चिकित्सक अशा चिंतामणी गणेश कर्वे यांनी कोशनिर्मितीचे प्रचंड काम केले. महाराष्ट्रीय विद्वत्तेचा आदर्श म्हणून त्यांच्या शब्दकोशाकडे पाहिले जाते. माहितीचा अचूकपणा, मांडणीचा नेटकेपणा व संक्षेप, सूक्ष्म संशोधन, बुद्धी आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन ही त्यांच्या लेखनाची प्रमुख वैशिष्टय़े!
भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.
चिंतामणी गणेश कर्वे यांचे १६ डिसेंबर १९६० रोजी निधन झाले.
Leave a Reply