ज्येष्ठ बालसाहित्यिक दत्ता टोळ यांचा जन्म २१ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
दत्ता टोळ हे खासकरून बाळगोपाळांसाठी लिहिणारे लेखक. त्यांनी अमरेंद्र दत्त असं टोपण नाव वापरूनसुद्धा काही लेखन केलं होतं. अमरेंद्र गाडगीळ या आपल्या गुरूंच्या स्मृती जपल्या जाव्यात तसेच, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टोळ यांनी हा निर्णय घेतला होता. गुरूचे आणि स्वत:चे पहिले नाव एकत्र करून ‘अमरेंद्र दत्त’ या नावाने त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे.
२००२ साली नगरमध्ये भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मुलांमध्ये वाचनाची आवड वाढावी, यासाठी दत्ता टोळ यांनी पालिकेच्या शाळांमध्ये १५० बालवाचनालये सुरू केली.
अमृतपुत्र विवेकानंद, कारगिलच्या युद्धकथा, महाराष्ट्राचे मानकरी, संस्कारकथा, तेजस्वी पत्रे, वादळ वाटेवरील सोबती, अक्षरदीप, बागुलबोवा गेला, भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, जय मृत्युंजय, कल्पनाराणी, मृत्युंजयाच्या कथा, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply