साम्राज्य विस्तार आणि विस्तारलेल्या साम्राज्याचे रक्षण या बाबत इंग्रज शासक कमालीचे जागरूक होते. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धापासून इंग्रज अधिकच सावध झाले होते. हिंदुस्थानचा स्वातंत्र्य संग्राम व त्यातील स्वातंत्र्य सेनानी यांच्यावर इंग्रजांची करडी नजर होती.
स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याचा मुकुटमणी विनायक दामोदर अर्थात तात्याराव सावरकरांनी इंग्लन्ड मध्ये राहून आरंभिलेल्या क्रांतिकार्याची झळ इंग्रजांना चांगलीच जाणवू लागली होती. १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध, मॅझीनीच आत्मचरित्र या सारख्या साहित्यातून सावरकरांनी मांडलेल्या तर्कशुद्ध व सडेतोड राष्ट्रप्रेमी विचारांनी इंग्रज सरकार ची झोप उडाली होती. त्यामुळेच २४/१२/१९१० रोजी इंग्रज सरकारने सावरकरांना २ काळ्यापाण्याची शिक्षा( ५० वर्षे) सुनावली व त्यांची रवानगी अंदमान येथील सेल्युलर जेल मध्ये करण्यात आली.
आज अंदमान हे प्रामुख्याने पर्यटनाच्या दृष्टीने ओळखले जाते मात्र त्याकाळात अंदमान हे अतिशय खडतर तुरूंगवासासाठी ओळखलं जातं होत. अतिशय निर्ढावलेल्या कैद्यानाही तेथील शाररिक व मानसिक हाल सहन करता आलेले नाहीत. मात्र सावरकर या सगळ्याला पुरून उरले. अंदमानच्या जेलर ने ५० वर्षे काळ्यापाण्याच्या शिक्षेची भीती दाखवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ५० वर्ष इंग्रज सत्ताच शिल्लक रहाणार नाही पण मी मात्र असेन असे सडेतोड उत्तर दिले होते.”अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला” या ओळी सावरकरांनी शब्दशः खऱ्या केल्या.
सावरकरांची काळ्या पाण्याची शिक्षा २४/१२/१९६० रोजी संपणार होती. मात्र तत्पूर्वीच आपला देश स्वतंत्र झाला.
स्वातंत्र्य प्राप्तीच्या दुर्दम्य इच्छेच्या जोरावर सावरकरांनी जणू मृत्यवर विजयच मिळवला होता. याच स्मरण म्हणून तसेच सावरकर कुटुंबाने देश स्वतंत्र होण्यासाठी सर्वस्वाची होळी केली त्याला अभिवादन म्हणून भारतभरातील नागरिकांनी मिळून २४ /१२/१९६० हा दिवस मृत्युंजय दिन म्हणून साजरा केला.
आज मृत्युंजय दिनानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांना विनम्र अभिवादन.!
Leave a Reply