नवीन लेखन...

दिवंगत आत्मीय बाबासाहेब पुरंदरेंची आठवण !

बळवंत मोरेश्वर पुरंदरे उपाख्य बाबासाहेब हे झाड एका महापुरुषाने झपाटलेले होते – छत्रपती शिवाजी महाराज !

नव्वदी ओलांडलेले हे झाड त्या दिवशी सायंकाळी बरोबर सहा वाजता रंगमंचाच्या पूजेसाठी आणि आई भवानीला दंडवत घालण्यासाठी उपस्थित होते. बरोबर साडेसहा वाजता शिरस्ता न मोडता,”जाणता राजा ” चा प्रयोग सुरु झाला. ( १९९४-९५ मध्ये चिरंजीवांसह न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोडच्या मैदानावर आणि त्यानंतर १९९९ मध्ये नाशिकला मित्राच्या कुटुंबियांसमवेत मी प्रयोग पाहिलेले ,पण ती वेळेच्या शिस्तीची परंपरा तेव्हाही अनुभवली होती.) फारसे उजेडात नसलेले कलावंत घेऊन नेहेमीच्या भव्यतेने हा १५३६ वा प्रयोग संपन्न झाला, त्यावेळी जुनाच थरार अनुभवाला.

महानायकाचे अभिजात मोठेपण तितक्याच वज्रासम हातांनी पेलायला हवे ना ?

त्या दिवशीचा नाट्यानुभव (दृक् -श्राव्य) तोही मोकळ्या मैदानात महानाट्याच्या रूपात आमच्या नातीसाठी नवा होता. वयाच्या पाचव्या वर्षी लावणी – कव्वाली , अभंग ,ओव्या, भजन, भारूड, पोवाडा या श्रीमंत परंपरा तिला एका छताखाली भेटल्या. बुरुज होता पण हिरकणीला ती शोधत राहिली.

गोष्टींमध्ये ऐकलेली बरीचशी पात्रं तिला अनुभवायला मिळाली. तिने वेळोवेळी ताल धरून दिलेली दाद आम्हीं उभयता एन्जॉय करीत होतो.

तिला हा प्रकार आवडेल की नाही याबाबत साशंक असलेले आम्ही, जेंव्हा निघताना ती “पुन्हा येऊ” असं म्हणाली तेव्हा पूर्ण भरून पावलो. महाराजांच्या काळात आमचे पूर्वज असतीलच, पण आज आमच्या वंशजांनाही “शिवाजी” नावाचे गारुड भुरळ घालतंय याबाबत बाबासाहेबांचे आभार मानायलाच हवेत.

– डॉ. नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..