रुडयार्ड किपलिंग यांचा जन्म ३० डिसेंबर १८६५ रोजी झाला.
नेटफ्लिक्सवर गाजत असलेला मोगलीचा सिनेमा जगभरातल्या लोकांना आवडतोय. रुडयार्ड किलपिंग यांनी १८९३ साली जंगल बूक हा कथासंग्रह लिहिला तेव्हापासून असंच सुरू आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पेंच अभयारण्यात त्यांनी जंगलात वाढलेला एक मुलगा पाहिला होता. त्यावरची ही कथा आतापर्यंत गाजतेय.
१८९९ ला मोगलीवरचा पहिलं नाटक आलं. त्यानंतर १९४२ ला मोगली नावाचा सिनेमा आला. त्यानंतर अनेकदा अनिमेनशन सिनेमे, सिनेमे येतच राहिले. त्यावरून प्रेरणा घेतलेल्या टारझनचेही असेच अनेक अवतार आले. हे एवढं अस्सल आलं कारण रुडयार्ड यांचा जन्म भारतातच झाला होता. तोही मुंबईत. पुढे पत्रकार म्हणून ते देशभर फिरले. त्यावर आधारित कथा, कविता, कादंबऱ्या लंडनला परतल्यावर लिहिल्या. ज्यांनी एकूणच इंग्रजी साहित्यावर प्रभाव पाडला.
वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी त्यांना साहित्याचं नोबेल मिळालं. इतक्या कमी वयात दुसऱ्या कोणालाच साहित्याचं नोबेल मिळालेलं नाही.
रुडयार्ड किपलिंग यांचे १८ जानेवारी १९३६ रोजी निधन झाले.
Leave a Reply