वानखेडे स्टेडियम म्हणजे ‘भारतीय क्रिकेटची पंढरी.’ इंग्लंडमध्ये जसे लॉर्ड्सला महत्त्व आहे, तसेच भारतात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला. वानखेडे स्टेडियम २०११ सालच्या विश्वचषक अंतिम सामन्यासह अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार आहे.
गेल्या चार दशकांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांची मुंबईकरांना मेजवानी देणाऱ्या या स्टेडियमला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष एस.के. वानखेडे यांचे नाव देण्यात आले होते.
२३ ते २९ जानेवारी १९७५ मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला गेला. हे कसोटी क्रिकेटमधील जगातील ४८ वे मैदान ठरले. वेस्ट इंडिज विरुद्धचा हा सामना भारताने २०१ धावांनी गमावला. वेस्ट इंडिजने ती मालिका ३-२ अशी जिंकली. विंडीज कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांची कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट २४२ नाबाद ही खेळी याच सामन्यातली. त्यांना बिशनसिंग बेदी यांनी शून्यावर जीवदान दिले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply